Take a fresh look at your lifestyle.

‘शेर शिवराज’मध्ये कपटी खानाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे वक्तव्य चर्चेत

0

हॅलो बॉलिवुड ऑनलाईन। प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टकातील चौथे पुष्प असणाऱ्या शेर शिवराज चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च झाला. हा सोहळा इतका बहारदार होता कि डोळ्याचे पारणे फिटले. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पहायला मिळणार आहे. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ हा शिवकालीन इतिहासाचा एक महत्वपूर्ण अध्याय आहे.

या चित्रपटात शिवरायांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर साकारणार असल्याचे सर्वाना माहित होते. पण अफजल खानाची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न सर्वाना पडला होता. अखेर याचे उत्तर मिळाले आहे. क्रूर आणि कपटी अफजल खानाच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता मुकेश ऋषी दिसणार आहेत. त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले कि महाराजांच्या दराऱ्यामुळेच भारताकडे वाकडया नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. हे विधान चर्चेत आहे.

दरम्यान या चित्रपटातील अफजल खानाची भूमिका साकारणारे बॉलिवूड अभिनेता मुकेश ऋषी यांनी आपल्या भूमिकेबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर उभी राहणारी ही व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मिळाल्याचा मला फार आनंद आहे. तसेच ज्याच्या ध्यासात छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशा कल्पक आणि अभ्यासू दिग्दर्शकासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दराऱ्यामुळेच भारताकडे वाकडया नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही हे माझे स्पष्ट मत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘शेर शिवराज ‘ हा चित्रपट २२ एप्रिल २०२२ रोजी रुपेरी पडदयावर प्रदर्शित होणार आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी भूमिका साकारली आहे. तर बलाढ्य अफजलखानाच्या रुपात मुकेश ऋषी त्यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, वैभव मांगले, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर,ईशा केसकर, रिशी सक्सेना, अशी कलाकारांची तगडी फौज पहायला मिळणार आहे.