Take a fresh look at your lifestyle.

जन्म आणि मृत्यूच्या दरीतील थरारक कथा; सुव्रत जोशी घेऊन आलाय ‘अंधारातील हाका’

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील ओळखीचा चेहरा ज्याने मालिका गाजवल्या आणि चित्रपटांमधूनही एक वेगळी छाप पाडली तो म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी. सुव्रतचा स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग आहे आणि त्याची मोठी संख्या आहे. सुव्रत सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. यामुळे अनेकदा तो आपल्या आगामी आणि चालू प्रोजेक्टबाबत आपल्या चाहत्यांना माहिती देताना विविध पोस्ट करताना दिसतो. अशीच एक पोस्ट त्याने आठवड्याभरापूर्वी केली होती. या मध्ये त्याने स्टोरीटेलशी संबंधित एका प्रोजेक्टची माहिती दिली आहे. काही दिवस अनेकांनी याकडे दुर्लक्ष केला पण ज्यांनी त्याची पोस्ट पहिली त्यांनी तो थरार अनुभवला जो कुणीही अनुभवला नसेल. हा थरार आहे जन्म आणि मृत्यूच्या दरीतला.

अभिनेता सुव्रत जोशी हा सोशल मीडियावर सक्रीय असल्यामुळे नेहमीच विविध पोस्ट करताना दिसतो. असेच काही दिवसांपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने गेल्या आठवड्याभरापासून चांगलाच जोर धरला आहे. या पोस्टचे विशेष म्हणजे त्याचे कॅप्शन. या कॅप्शननेच सुव्रतची पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली आहे. ‘येत्या अमावस्येला घेऊन येत आहोत जन्म आणि मृत्यू यांच्या मधल्या दरीत अडकलेल्या विदेहीच्या भीतीदायक गोष्टी…”विदेही विनाशक अगस्त्य”ने दिलेल्या अंधाराच्या हाका! सुव्रतचे हे कॅप्शन पाहून अनेकांना घाम फुटला तर अनेकांच्या उत्सुकतेने परिसीमा गाठली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sula (@suvratjoshi)

मित्रांनो, “अंधाराच्या हाका” हे अगदी नावाप्रमाणेच रसिकांचे कुतूहल वाढविणारे शीर्षक ठरले आहे. या शीर्षकातच इतका थरार आणि भीती आहे तर या कथेत किती असेल? असा प्रश्न प्रत्येकाला पडतोय. हि कथा तुम्हाला ऐकायला मिळेल ‘स्टोरीटेल’ ऍपवर. स्टोरीटेलवर ‘अंधाराच्या हाका’ हि ऑडिओबुक उपलब्ध आहे. अगदी चाहत्यांची उत्कंठा वाढविण्यासोबतच त्यांना गहन आणि थरारक अनुभूती देणारी हि कथा आहे. यात अभिनेता सुव्रत जोशीच्या सहजसुंदर श्राव्यभिनायाने हा थरार आणखीच रोमांचक केला आहे. तर लेखक संवेद गळेगावकर यांच्या मांडणीतून ‘अंधाराच्या हाका’ मधील नायक अगस्त्य मुझुमदार सुष्ट आणि दुष्ट शक्तींशी कसा लढतो हे ऐकणे रंजक ठरणार आहे.