Take a fresh look at your lifestyle.

वरून धवनला वाहतूक पोलिसांचा दणका; विना हेल्मेट गाडी चालवणे आले अंगलट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याच्या ‘बवाल’ चित्रपटाचे कानपूरमध्ये शूटिंग सुरू आहे. ज्यासाठी तो कानपूरमध्ये आहे. दरम्यान विना हेल्मेट गाडी चालवल्यामुळे वाहतूक पोलिसांनी नियमानुसार त्याचे चलन कापल्याचे घटना घडली. हे विना हेल्मेट बुलेट चालवण्याचे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. दरम्यान शूटिंग चालू असताना वरुणने वापरलेल्या बुलेटवर बनावट नंबर प्लेट होते असे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, बुलेट गाडीवर उन्नाव येथून नोंदणीकृत स्प्लेंडर बाइकचा क्रमांक असल्याचे निदर्शनास आले आहे. यानंतर त्याच्या फोटोच्या आधारे चलनाची कारवाई करण्यात आली आहे.

सध्या या चित्रपटाचे कानपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग सुरू आहे. या शूटिंग दरम्यान एक काळी बुलेट गाडी चालवताना वरुणने हेल्मेट घातले नव्हते. इतकेच नव्हे तर हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याचा वरूनच एक फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंटदेखील केल्या आहेत. बनावट नंबर प्लेटच्या मुद्द्यावर अद्याप वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान वरुणला नोटीस पाठवण्याची तयारीही पोलिसांकडून सुरू असल्याचे समजत आहे.

रिपोर्टनुसार, बुधवारी पी रोड मार्केटच्या रस्त्यावर वरुणने बुलेट चालवली. याबाबत माहिती देताना कानपूरचे डीसीपी ट्रॅफिक संकल्प शर्मा यांनी माध्यमांना सांगितले की, दोन दिवसांपूर्वी कानपूर नगरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एमव्हीए कायद्या अंतर्गत काही नियम आहेत. ज्यांचे उघड उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये हिंसाचारदेखील करण्यात आला आहे. आम्हाला मिळालेल्या फोटोच्या आधारे आम्ही एमव्हीए कायद्यानुसार पुढील सर्व कारवाई करत आहोत.