Take a fresh look at your lifestyle.

आनंदाच्या खेळाला नवा सूर; ‘झिम्मा’च्या अल्टिमेट टायटल सॉन्गची सोशल मीडियाला चढली भूल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या जगात एकच गोष्ट अशी आहे जी ओळखणं सोप्प नाही. ती म्हणजे, बायकांच्या मनात काय सुरु आहे, त्या कधी कशा व्यक्त होतील. काय पटलं ना? अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात आणि मनसोक्त जगायचं प्रयत्न करतात तेव्हा जी धमाल होते, तीच धम्माल मराठमोळ्या आगामी ‘झिम्मा’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. ‘झिम्मा’च्या टिझरनंतर एकंदरच सर्वत्र या चित्रपटाची भन्नाट गॉसिपिंग सुरु झाली आहे. यानंतर आता या बनोख्या आणि हळव्या कथानकाच्या चित्रपटाचे झिम्मा सॉन्ग रिलीज झाले आहे.

इंग्लंडला फिरायला निघालेल्या या सात जणींचा प्रवास अतिशय रंजक असून थोडा भावनिक तर थोडा हटके असा हा चित्रपट असणार आहे. नुकतेच रिलीज झालेले झिम्मा गाणे इतके बहारदार आहे कि बाईचं बाईपण आणि मनात दडलेलं तीच लहानपण यात दिसून येत आहे. होऊन जाऊ दे पुन्हा गं आता जोरात! जिथं जाऊ तिथं खेळू आम्ही तोऱ्यात! खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा गं, असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर आणि सुहास जोशी यांनी गेले आहे.

संगीत अमितराज यांनी दिले असून गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात दंगा करणाऱ्या या ७ महिला म्हणून सुहास जोशी, निर्मिती सावंत, सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले दिसतील. तर सहाय्यक भूमिकांमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे दिसतील. चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेनेच केले आहे तर कथा इरावती कर्णिक यांची आहे.

या चित्रपटात इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणं करणारी आई-मुलगी, घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघालेली बाई, मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी द्विधा मनस्थितीत असलेली आई, तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळ्या विचारांच्या, एकमेकींशी ओळख नसणाऱ्या पण मनातून सगळ्या टोट्टल सेम असणाऱ्या या स्त्रियांचा हा एक अनोखा प्रवास यात पाहायला मिळेल.

या महिलांना त्यांची स्वतःशी आणि इतरांशी एक नवी ओळख करून देणारी ही सफर सिद्धार्थ चांदेकर घडवून जाणार आहे. ‘झिम्मा’ हा अत्यंत सकारात्मक, धमाल, मस्ती, मजा देणारे आणि मनोरंजनाचे एक फुल्ल पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे. हा चित्रपट १९ नोव्हेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे त्यामुळे जरूर पहा मनोरंजनाचा अल्टिमेट कहर ७ बायकांची अनोखी साथ ‘झिम्मा’.

Leave A Reply

Your email address will not be published.