Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Happy Birthday Salman Khan: बॉलिवूडच्या करण- अर्जुनची गळाभेट; सोशल मीडियावर VIDEO झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 27, 2022
in Trending, Hot News, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
SRK_Bhaijan
0
SHARES
248
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २७ डिसेंबर आणि आज बॉलिवूडच्या भाईजानचा वाढदिवस आहे. (Happy Birthday Salman Khan) भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज त्याचा ५७’वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी मोठी बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये शाहरुख खानचासुद्धा समावेश होता. आता शाहरुख आणि सलमान हे समीकरण तर सर्वश्रुत आहे. पण आजकाल शाहरुख – सलमानचं एकमेकांवर उतू जाणारं प्रेम आपण सारेच पाहतोय. यावेळी दोघांनी गळाभेट घेतली आणि सेलिब्रिटी फोटोग्राफर्सला काही पोझसुद्धा दिल्या.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

(Happy Birthday Salman Khan) आज प्रेक्षकांच्या लाडक्या भाईजानचा बर्थडे असल्यामुळे सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर सलमानसाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दरम्यान काल रात्री १२ वाजता बर्थडे पार्टीदरम्यान सलमानने माध्यमांसोबतही वाढदिवसाचा केक कापला आणि यावेळी त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसले. यावेळी सलमानचे निकटवर्तीय आणि इंडस्ट्रीतील बरेच दिग्गज सेलिब्रिटी पार्टीत सामील झाले होते. सलमानच्या बर्थडे पार्टीसाठी शाहरुख काळ्या रंगाच्या कॅज्युअल ड्रेसिंगमध्ये दिसला. पार्टी झाल्यानंतर सलमान शाहरुखला सोडण्यासाठी बाहेर आला आणि यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी मारत निरोप घेतला.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद कित्येक वर्षांपासून आपण पाहत आलो आहे. एकेकाळी एकमेकांचं तोंडही न पाहणाते बॉलिवूडचे हे दोन सितारे आज एकत्र चमकताना दिसले. (Happy Birthday Salman Khan) काही वर्षांपूर्वी झालेले वाद आता पूर्णपणे मिटल्याचे हे संकेत आहेत, असे म्हणायला हरकत नाही. आता सलमान आणि शाहरुख दोघेही चांगले मित्र झाले आहेत. जे पाहून चाहत्यांनीही दोघांचे कौतुक केले आहे. दरम्यान, सलमानच्या बर्थडे पार्टीत सोनाक्षी सिन्हा, संगीता बिजलानी, सलमानचे भाऊ अरबाज व सोहेल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हजर होते.

Tags: Bollywood CelebritiesInstagram PostSalman KhanShahrukh KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group