Take a fresh look at your lifestyle.

तिच्या मित्रांनी तिला वाळीत टाकलंय; विकास- सोनालीचा गायत्रीबाबतच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ हा शो सध्या चांगलाच गाजताना दिसतोय. या शोचं सुरुवातीलाच घरात २ ग्रुप पडले होते. टीम A ज्यामध्ये उष्कर्ष, जय, गायत्री, मीरा, दादूस, स्नेहा, तृप्ती, सुरेखा आणि अक्षय असे सगळे होते. तर टीम B मध्ये विकास, विशाल, सोनाली, मीनल हे एकत्र होते. यानंतर टीम A मधील बरेच सदस्य हळूहळू घराबाहेर झाले पण जय, मीरा, उत्कर्ष, गायत्री एकत्र होते. पण आता मात्र त्यांच्यात फूट पडल्याचं दिसतय. इतकंच नव्हे तर या टीमने आपलीच मैत्रीण गायत्री दातार हिला वेगळं केलं आहे. त्यामुळे आता गायत्रीला एक प्रकारे वाळीत टाकलं आहे, असं मत विकासचं झालं आहे. याविषयी त्याने सोनालीलादेखील सांगितलं आणि त्यांचं हे संभाषण चांगलाच चर्चेत आलं आहे.

टीम A च्या मेंबर्सने गायत्रीला एकटं सोडलं आहे हे उघड दिसत असताना विकास पाटील आणि सोनाली पाटील यावर चर्चा करताना आज दिसतील. सध्या टीम A मध्ये फूट पडली असून जय, मीरा आणि उत्कर्ष यांनी गायत्रीसोबत अबोला धरला आहे. बऱ्याचदा ते आपआपसात गायत्रीविषयी चर्चा करताना आणि तिच्याबद्दल वाईट साईट बोलताना दिसतात. अगदीने गायत्रीने कशाप्रकारे विश्वासघात केला, ती विकास सोनालीच्या मागेपुढे करते, तिला स्वतःच मत नाहीये असं बराच काही. यावर आज विकास आणि सोनाली चर्चा करताना दिसतील. असा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून त्यांचे संभाषण चांगलेच चर्चेत आहेत.

गायत्रीसोबत इतरांचं वागणं पाहून यावर विकास आणि सोनाली खंत व्यक्त करताना सोनाली म्हणते, “जय मला म्हणत होता पहिल्यापासून तिला कसं खेळायचं हे आम्ही तिला गाईड करत आलो, तो त्याची बाजू मांडत होता. तर मी म्हटलं बरोबर आहे पण, मी तुला तेच सांगते तुमच्या दोघांबद्दल तिची काहीच तक्रार नाहीये. कशाला त्या मुलीबद्दल…आधीच पाण्यात बघतात तिला, लागलं आहे तिच्या हाताला त्या गोष्टीचं काहीचं नाही त्यांना. यावर विकास म्हणतो, “पण तिला त्यांनी असं पूर्णत: वाळीत टाकल्यासारखचं केलं आहे म्हणजे एक असतं ना की, आता काय ही जाणारच आहे, त्यामुळे काय आता आपल्याला उपयोग काही नाही त्या पध्दतीनेचं चालू आहे…”. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर टीम A बाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. या सगळ्यात गायत्री कशी सामोरी जाते याबाबत अनेकांनी उत्सुकता दाखवली आहे.