Take a fresh look at your lifestyle.

गेम ऑफ थ्रोन्सच्या तोडीची नेटफ्लिक्सची नवी सिरीज: ‘द विचर’

0

टीम, हॅलो बॉलीवूड । बघता बघता नेटफ्लिक्सने अख्या जगासोबत भारतातही जम बसवलेला दिसतोय. अजून खेड्यकडे नसला तरी शहरात याचा मोठा तरुण चाहता वर्ग आहे. पाश्चिमात्य देशांच्या गेम ऑफ थ्रोन्स, ब्रेकिंग बॅड, फ्रेंड्स अशा TV सिरीजचा मोठा बोलबाला तरुणांच्या लॅपटॉप सर्कल मध्ये असतो. त्याच्यातही महा रसिक लोकांसाठी मस्त खबर आहे कि HBO या पारंपरिक चालत आलेल्या मोठ्या TV नेटवर्कला चाललेंगे देण्यासाठी नेटफ्लिक्सने कधीपासून कंबर कसली आहे. त्यातलाच भाग म्हणून, एक नवीन वेब सिरीज येणार आहे.

‘विचर’ ही नेटफ्लिक्सची नवीन वेब सिरीज, एचबीओच्या गेम ऑफ थ्रोन्सला उत्तर देण्यासाठीच बनवली आहे असं भासतं. लॉरेन शमिट यांची हि निर्मिती असून ती नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. हेनरी कॅविल, फ्रिया एलन आणि अन्या चलोत्रा ​​यांच्या यामध्ये मुख्य भूमिका असतील. ‘विचर’ पॉलिश लेखक आंद्रेझेज सॅपकोव्स्की यांच्या लघुकथा आणि कादंबरीवर आधारित आहे.

सिरीजची निर्मिती गुणवत्ता भव्य असून डिरेक्टर सांगू इच्छित असलेल्या कथेसाठी योग्य असल्याचे दिसते. या मालिकेचे चित्रीकरण हंगेरी, स्पेन, ऑस्ट्रिया आणि पोलंड या चार देशात सात महिन्यांत झाले. प्रॉडक्शन डिझायनर अँड्र्यू लॉज म्हणतात, “आम्हाला साहजिकच कथेच्या स्वाभाविक मुळांचा सन्मान करायचा होता. आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला. जुन्या तटबंदी असलेल्या न्युरमबर्ग सारख्या मध्ययुगीन शहरांमधून आम्ही प्रेरणा घेतली. आम्ही मध्य पूर्व, इजिप्त, जपान, भारत मधील आशियातील वास्तुकलेकडे पाहिले. आम्ही या जागतिक प्रभावांना कथेत समाविष्ट केले आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: