Take a fresh look at your lifestyle.

कमाल केलीस मित्रा! तरुण गायकाने ‘पुष्पा’ चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याचे 5 भाषेत केले गायन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. यात काही अतरंगी तर काही प्रतिभावान कलाकारांच्या विविध कला पाहायला मिळतात. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या पुष्पा चित्रपटाच्या श्रीवल्ली गाण्याची क्रेझ सोशल मीडियावर चांगलीच पाहायला मिळाली आहे. यानंतर आता श्रीवल्ली गाण्याचे ५ भाषांमध्ये एका तरुण गायकाने गायन केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या प्रतिभावान गायकाचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या सुंदर आवाजात पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाणे गाताना दिसत आहे. मुख्य म्हणजे हे गाणे एक, दोन आणि तीन नव्हे तर तब्बल पाच वेगवेगळ्या भाषेत त्याने गेले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर हळूहळू ट्रेंड होऊ लागला आहे. या व्यक्तीने एकूण ५ भाषांमध्ये श्रीवल्ली हे गाणे गाऊन सर्वांची मने जिंकली आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी विविध कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना या गाण्याचे तेलुगू व्हर्जन आवडले आहे. अनेकांना या गाण्याचे हिंदी व्हर्जन आवडले आहे, तर अनेकांनी व्वाह रे पठ्ठ्या आणि कमाल केलीस भावा अशा प्रकारे कमेंट करीत कौतुकाचा वर्षाव केला आहे.