Take a fresh look at your lifestyle.

‘एकत्र कुटुंबासारखं सुख या जगात कुठेच नाही’; अभिनेता मिलिंद गवळींची भावनिक पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध वाहिनी स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ हि अगदी कमी काळात अनेक रक्षकांच्या पसंतीस उतरली. दरम्यान या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांची आवडती असली तरीही कधी कधी मालिकेतील अनिरुद्ध प्रेक्षकांना खटकतो. हि भूमिका अभिनेता मिलिंद गवळीने साकारली आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामुळे याच्या माध्यमातून फोटो व व्हिडीओ ते शेअर करतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करीत सोबत मालिकेतील एका प्रसंगाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अनिरुद्ध या भूमिकेविषयी त्यांनी सांगितले आहे. सोबतच्या कॅप्शनने तर सर्वांचे लक्ष वेधलेच आणि पोस्ट वाचल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हि पोस्ट सध्या वायरल पोस्टपैकी आहे.

अभिनेता मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, आयुष्याच गणित बिघडलं की ते सुधारता येईल का? अनिरुद्ध देशमुख एकामागे एका मागे एक चुका करत चाललाय, बारा-तेरा वर्षापूर्वी त्याच्या आयुष्याचं गणित चुकलं, त्याच्याकडून एक चूक झाली, ती अनिरुद्धला सुधारता आली असती का? आली असती तर अनिरुद्ध सारखा सुखी माणूस कोणीच नसता, आणि त्याच्याबरोबर त्याचा परिवार ही सुखी राहिला असता, असं म्हणतात ना की एक खोटं लपवण्यासाठी १०० वेळा खोटे बोलावे लागते, तसंच आयुष्यात एक मोठी चूक केली की त्याच्या मागे तुम्ही शंभर चुका करत राहता. वेळीस जर ती चूक कबूल करून सुधारली नाही तर आयुष्याची फडफड होऊ शकते, फक्त त्याची स्वतःची नाही तर त्याच्याबरोबर जोडलेल्या त्याच्या नातेवाईकांची मित्रमंडळींची स्वकीयांची सगळ्यांची, किती घरांमध्ये हीच परिस्थिती आहे, मनं दुखावली जातात, काहींमध्ये अहंकार असतो. ‘एकत्र कुटुंबासारखं सुख या जगात कुठेच नाही’

पुढे, दुसऱ्यांचा विचार करत नाहीत, लोकं स्वार्थी होतात, आणि मग त्याच्यावर एकच उपाय, उपाय म्हणजे , “त्यापेक्षा आपण वेगळे राहूया” आणि लोक वेगळी होतात, त्यात सगळ्यांचं नुकसान होतं, कळत नाही बऱ्याच लोकांना, एकत्र कुटुंब सारखं सुख या जगामध्ये कुठेच नाही, आई वडील आजी आजोबा मुली सुना नातवंड पतवंडं काका मावशी आत्या मामा आणि काही अतिशय जवळची मित्रमंडळी, हल्ली दिवाळीला सुद्धा एकत्र येत नाहीत. हे सगळं बदलेल का? येतील का लोक परत एकत्र छान सण साजरा करायला, दुरावलेली माणसं परत एकत्र आली किती मजा येईल, अनिरुद्ध देशमुख सुधारला तर किती मजा येईल? डोळे उघडतील का त्याचे? आशा ठेवूयात. मिलिंद गवळी.