Take a fresh look at your lifestyle.

दाक्षिणात्य सुपरस्टार सुरिया अभिनित ‘सूरराई पोटरू’चा लवकरच हिंदी रिमेक येणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अँमेझोन प्राईम या डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्मवरवर रिलीज झालेला आणि अत्यंत बहुचर्चित आणि तितकाच संपूर्ण जगभरात सर्वाधिक पाहिला जाणारा सिनेमा ‘सूरराई पोटरू’ आता लवकरच हिंदी रिमेक होऊन प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. हा चित्रपट मूळ तामिळ भाषिक आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अगदी काहीच काळामध्ये हा चित्रपट संपूर्ण जगभरात पहिला जात आहे. मुख्य बाब अशी कि या चित्रपटाची चर्चा देश विदेशांत असून त्याचे कथानक प्रेक्षकांना चांगलेच भावलेले आहे.

‘सूरराई पोटरू’चा मूळ अर्थ बहादुराची प्रशंसा असा होतो आणि हा चित्रपट देखील काहीश्या अश्याच कथानकाला अनुसरून त्याच्या कहाणीची बांधणी केल्याचे दिसत आहे. या चित्रपटाची हि बहुचर्चित कहाणी त्या माणासाची आहे, ज्याने आपल्या देशात सामान्य माणासाचे विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण करून सत्यात अवतरवले. हि व्यक्ती म्हणजे एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जी आर गोपीनाथ. यांच्याच जीवनावर आधारित ‘सूरराई पोटरू’ला अगदी आपल्या देशापासून ते विदेशापर्यंत अत्यंत स्तुती मिळाली. इतकेच काय तर, ७८ व्या ग्लोब अवॉर्ड्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

अँमेझॉन प्राईम व्हिडिओची सहकारी रेटिंग एजन्सी यांनी या चित्रपटाला सार्वकालिक महान चित्रपटांमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, रेटिंग वेबसाईट आयएमडीबीही आता हळू हळू ट्विटरप्रमाणे होऊ लागली आहे. यात घरात बसल्या बसल्या अकाऊंट बनवून कोणत्याही सिनेमाला आपण कितीही रेटिंग देऊ शकता. मुंबईतील अनेक एजन्सी आता आयएमडीबी रेटिंग ठीक करण्याचा ठेका घेताना दिसून येत आहेत. आता तामिळ भाषिक चित्रपट ‘सूरराई पोटरू’ हिंदीत येणार असल्याची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर लोकांमध्ये याबाबत एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. अद्याप चित्रपटाबाबत अन्य कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र लवकर याबाबत इतर माहिती माध्यमांना दिली जाईल असे सांगण्यात आले आहे.