Take a fresh look at your lifestyle.

चित्रपट प्रेमींचा ऑगस्ट; एक- दोन- तीन नाही तर 10 चित्रपट याच महिन्यात होणार रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून चित्रपट पे चित्रपट अशी काही अवस्था झाली आहे. यापैकी काही हिट झाले तर काही फ्लॉप झाले. भल्याभल्यांनाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणे काही जमले नाही. पण मनोरंजनाशिवाय जीवनात मजाच नाही. त्यामुळे हा ऑगस्ट सुद्धा खास प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी विविध कथानकाचे विविध चित्रपट घेऊन येतोय. त्यामुळे चित्रपटप्रेमींसाठी हा ऑगस्ट खूप खास असणार आहे एव्हढं नक्की. चला तर अजिबात वेळ न घालवता कोणकोणते चित्रपट रिलीज होणार आहेत हे जाणून घेऊया. कारण त्यांना या महिन्यात असे अनेक चित्रपट पाहायला मिळणार आहेत जे केवळ उत्तमच नाहीत तर पडद्यावर त्यांची इतर चित्रपटांशी स्पर्धाही पाहायला

१) सीता रामम – अभिनेत्री मृणाल ठाकूरचा ‘सीता रामम’ हा एक बहुभाषिक चित्रपट आहे. हा एक अॅक्शन रोमान्स चित्रपट असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात मृणालसोबत दल्कर सलमान, रश्मिका मंदाना आणि सुमंत मुख्य भूमिकेत आहेत. तर हनु राघवपुडी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. हा चित्रपट येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

२) नार का सुर – हा अतिशय वेगळा चित्रपट आहे. याची कथा उत्तर प्रदेशातील सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये १२ महिला त्यांच्या हक्कांसाठी लढताना दिसत आहेत. यामध्ये त्यांच्या लढयातील लहान मोठे अडथळे आणि जीवाचा धोका दाखवला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुलदीप कौशिक यांनी केले आहे. या चित्रपटात ललित परिमू, मन्नत सिंग आणि दीक्षा मान हे कलाकार आहेत. हा चित्रपट येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

३) हरियाणा – हा चित्रपट ३ भावांच्या कथेवर आधारित असून हे तीन भाऊ प्रेमात पडल्यानंतर पुढे काय होत हे पाहणे मनोरंजक आहे. या चित्रपटात यश टोंक, अश्लेषा सावंत आणि मोनिका शर्मा हे कलाकार आहेत. हा चित्रपट येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

४) मियामी से न्यूयॉर्क – ‘मियामी से न्यूयॉर्क’ या चित्रपटाचं दिग्दर्शन जॉय ऑस्टिन यांनी केलं आहे. या चित्रपटात निहाना मिनाज, निखार कृष्णानी आणि रोहिणी चंद्र जैनाल लाकल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

५) लाल सिंग चड्ढा – अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर अभिनित ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=4UMs8NJhs-I

६) रक्षाबंधन – अभिनेता अक्षय कुमारचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटाला अपेक्षित यश मिळेल की नाही हा प्रश्न असला तरीही चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

७) कार्तिकेय २ – या चित्रपटाचं दिग्दर्शन चंदू मोंडेटी यांनी केलं आहे. तर हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या ५ भाषांमध्ये रिलीज होणार आहे. यात निखिल सिद्धार्थ, अनुपमा परमेश्वरन, आदित्य मेनन, अनुपम खेर आणि हर्षा चेमुडू यांसारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या १२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

८) यशोदा – अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अभिनित यशोदा हा चित्रपट बहुचर्चित चित्रपट आहे. या चित्रपटात समंथासोबत उन्नी मुकुंदन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हरेश नारायण यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या १२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

९) दोबारा – अभिनेत्री तापसी पन्नू अभिनित दोबारा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला आहे. हा एक मिस्ट्री ड्रामा असून यातील ट्विस्ट रंजक आहेत. हा चित्रपट येत्या १९ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

१०) लायगर – दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचे बॉलिवूडमध्ये आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पाँडेचे साऊथ इंडस्ट्रीमध्ये याच चित्रपटामुळे पदार्पण होत आहे. त्यामुळे प्रेक्षक ‘लायगर’साठी उत्सुक आहेत. पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर करण जोहर निर्मित हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.