Take a fresh look at your lifestyle.

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील विलास पाटीलची रिकामी जागा भरणार ‘हा’ अभिनेता

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मराठी मालिका मुलगी झाली हो सध्या चांगलीच चर्चेत आहे. याला कारण ठरलाय ते अभिनेता किरण माने याना अचानक मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवणे. या कारणामुळे मालिकेशी संबंधित विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान कलाविश्वातून आणि अगदी राजकीय पक्षांमध्येसुद्धा हे प्रकरण चर्चेत आहे. या सगळ्यात महत्वाचे म्हणजे मालिकेतील किरण माने साकारत असलेली विलास पाटील हि भूमिका रिक्त आहे. त्यामुळे लवकरच हि जागा भरणे गरजेचे असताना आता एका कलाकाराचे नाव चर्चेत आले आहे. अभिनेते आनंद अलकुंटे किरण मानेंनी साकारलेली विलास पाटीलची भूमिका साकारणार आहेत अशी चर्चा आहे.

अभिनेते किरण माने यांनी प्रोडक्शन आणि चॅनेलवर आपण राजकीय पोस्ट केल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकलं असा आरोप केला होता. यानंतर मालिकेतील महिला कलाकारांनी आपल्यासोबत मानेंनी गैरवर्तन केले असे सांगत गंभीर आरोपांची मालिका लावली. तर अन्य महिला कलाकारांनी मानेंच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या. तर मानेंच्या वर्तवणुकीमुळे आणि तक्रारींमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीनं दिल. यामुळे हे प्रकरण चिघळतच गेलं. यानंतर किरण मानेंची मालिकेतील जागा कोणा घेणार? असा मोठा सवाल उपस्थित झाला होता. यानंतर अभिनेते आनंद अलकुंटे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मात्र याबद्दल प्रोडक्शन हाऊसकडून कोणतीच अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मात्र प्रश्न असा कि, आनंद अलकुंटे हे किरण मानेंनी साकारलेल्या विलास पाटील या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतील का? कारण यापूर्वी किरण माने यांनी हि भूमिका अक्षरशः गाजवली आहे. दरम्यान किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर त्यांना ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या पोस्टरमधूनदेखील वगळण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये फक्त साजिरी आणि शौनक दिसून येत आहेत. त्यामुळे असेही आता किरण माने परततील अशी आशा नाही. त्यामुळे एकतर आनंद अलकुंटे नाहीतर कुणी और.. पण मालिकेतील विलास पाटील बदलणार एव्हढं नक्की.