Take a fresh look at your lifestyle.

आदीपुरुष मध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार सीता ची भूमिका

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. प्रभास या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभासने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून सिनेमाचं पोस्टर टाकायला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने या सिनेमात  सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार असल्याचं जाहीर केलं. हा चित्रपट रामायणावर आधारलेला असणार आहे. यात प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे. राम जर प्रभास असेल तर लक्ष्मण आणि सीता कोण असणार याची उत्सुकताही अनेकांना आहे.

या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत असणार आहे. तर सैफ रावणाच्या भूमिकेत असेल. या सिनेमात सीतेच्या भूमिकेत कियारा आडवानी असेल. कियाराने यापूर्वी कबीर सिंग, गुड न्यूज या सिनेमात कामं केली आहेत. आता तिला आदिपुरुषमध्ये सीता बनून येण्याची संधी मिळाली आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत करणार आहे. या सिनेमात इतर व्यक्तिरेखा कोण कोण साकारणार आहे ते अद्याप नक्की नाहीय. पण हा प्रोजेक्ट खूप मोठा असल्याने अनेक चांगले, तगडे कलाकार या सिनेमातल्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असणार आहेत. या सिनेमाचं बजेटही साडेतीनशे कोटींचं असेल असं बोललं जातं.