Take a fresh look at your lifestyle.

मालदीवच्या समुद्रात उसळली ज्वालामुखी; अभिनेत्रीच्या हॉटनेसने केला कहर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेइंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या बोल्डनेसमूळे सोशल मीडियावर नेहमीच वातावरण पेटलेलं असतं. त्यात आता नव्या युथने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला हि सोशल मीडियावर सक्रिय असते. अगदी २५ वर्षाची हि अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच आपल्या बोल्ड अवतारात दिसते. कधी फॅशन शूट तर कधी फ्रेंड्सपार्टी. अशा विविध फंक्शन आणि प्रोजेक्ट्सचे फोटो ती शेअर करताना दिसते. पण सध्या सोशल मीडियावर तिचा बिकिनी अवतार कहर करतोय. तिने हे फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि भल्याभल्यांचा घाम काढलाय.

आपण सारेच जाणतो कि सिने इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी मालदीव हि जागा बेस्ट व्हॅकेशनची खास पसंत आहे. त्यामुळे बहुतेक सारे सेलिब्रिटी आनंद अनुभवण्यासाठी मालदीव गाठतात. तसेच पूजा बेदीची मुलगी आणि अभिनेत्री अलाया एफसुद्धा मालदीवलाच व्हॅकेशनसाठी गेली आहे. दरम्यानचे काही फोटो तिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये अलाया तिची टोन्ड बॉडी दाखवताना दिसतेय. या फोटोत ती बिकिनी वेअरमध्ये मालदीवच्या समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसत आहेत. तिचे हे फोटो प्रचंड बोल्ड आहेत आणि हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री अलाया एफ मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना या फोटोत दिसत आहे. तिने हे फोटो शेअर करताना, मालदीवच्या उन्हात जादू अनुभवतेय असं वाटतंय..’ हे कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये आलिया तिचे अॅब्स फ्लॉंट करतेय आणि कातिल पोझ देताना दिसतेय. यामध्ये तिने प्रिंटेड ब्रॅलेट आणि शॉर्ट्स सेटसह मैचिंग केप परिधान केली आहे. यामध्ये खरंच ती हॉट दिसत आहे यात शंकाच नाही. अलाया एफचे समुद्र किनाऱ्यावरील हे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.