Take a fresh look at your lifestyle.

‘तुम्ही माझे *** पाहू शकत नाही’; रणवीरला कंपनी म्हणून प्रसिद्ध अभिनेत्रीचं शर्टलेस फोटोशूट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटने तर सोशल मीडिया गाजवला हे आपण जाणतोच. विविध भागात त्याच्या विरोधात निदर्शने झाली, त्याचा विरोध झाला. अनेकांनी त्याला ट्रोल केलं. पण बॉलिवूडकर मात्र रणवीरच्या पाठीशी उभे राहिले. रणवीर पाठोपाठ अनेक कलाकारांनी त्याच्यासारखं न्यूड आणि सेमी न्यूड फोटोशूट केलं. आता या समर्थन करणाऱ्यांमध्ये कलर्स हिंदीवरील ‘खतरों के खिलाडी १२’मधील स्पर्धक आणि मॉडेल एरिका पॅकर्डचाही समावेश झालाय. तिने फक्त बोल्ड फोटोशूट नव्हे तर त्याच्यासोबत बोल्ड कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.

रणवीरच्या न्यूड फोटोशूटमुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पण तरीही कलाकारांनी त्याची साथ सोडली नाही. आता काय तर मॉडेल एरिका पॅकर्डने त्याच्याकडून प्रेरणा घेत बोल्ड फोटोशूट केलंय. फक्त फरक एव्हढाच कि, तिने पूर्ण न्यूड फोटोशूट केलेलं नसून ती फक्त शर्टलेस झाली आहे. प तरीही नेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या असतील यात काही शंकाच नाही. तिने हे फोटो अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ”रणवीर सिंगला कंपनी (सोबत) देत आहे, पण तुम्ही माझे बम पाहू शकत नाहीत.” एरिकाच्या या फोटोशूटवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काही नेटकरी तर काही सेलेब्स आहेत.

एरिकाने रणवीरच्या पाऊलांवर पाऊल टाकत हे सेमी न्यूड फोटोशूट केले आणि शेअर सुद्धा केले आहे. यामध्ये तिने शर्टलेस होऊन कॅमेरासाठी वेगवेगळ्या आकर्षक पोझ दिल्या आहेत. एरिकाने या फोटोंमध्ये लाईट ब्ल्यू रंगाची जीन्स परिधान केली आहे. तर यासोबत सुंदर हेअर स्टाईलदेखील तिने केली आहे.

एरिकाच्या या फोटोवर अभिनेत्री रिद्धिमा पंडितने कमेंट करत लिहिले आहे की, “ओह मामाचिता.” तर एका युजरने मजेशीर अंदाजात लिहिले आहे की, मी आता कॅमेरामॅनचा जॉब करायला जाणार आहे. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘रणवीर सिंग कुठे आहे?’ अशाप्रकारे एरिकाचे हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.