Take a fresh look at your lifestyle.

TRP’ची घोडदौड! टॉप 10’च्या यादीमध्ये ‘या’ मराठी मालिकांचा समावेश; जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या एकही मराठी वाहिनी अशी नाही जिची लोकप्रियता मोजता मापता येईल. यात झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह, सोनी मराठी आणि अश्या अनेक मराठी वाहिन्यांचा समावेश आहे. या प्रत्येक वाहिनीवर अनेक मालिका प्रसारित होत आहेत. यातील कितीतरी मालिकांचे कथानक, त्यातील पात्रे हि प्रेक्षकांच्या आपलीशी आपल्या घरातली वाटतात. त्यामुळे या मालिकांमध्ये TRP’ रेटिंगमध्ये चांगलीच चढाओढ दिसत असते. आता प्रेक्षकांच्या स्मरणात राहायचे असेल आणि लोकांसाठी नेहमीच खास व्हायचे असेल तर TRP रेटिंग हाय असणं खूप गरजेचं असत. त्यामुळे नंबर वन होण्यासाठी प्रत्येक मालिकेची एक वेगळीच चढाओढ चालू असते. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि TRP च्या रेसमध्ये कोणत्या मालिकांचं घोडं अडलंय आणि कोणत्या मालिकेचं घोड सुसाट पळतंय ते खालीलप्रमाणे:-

सध्या वेगवेगळ्या मराठी वाहिन्यांवर वेगवेगळ्या बऱ्याच मालिका सुरू आहेत. त्यामुळे खरंतर समीक्षकांसाठीही अनेकदा नंबर वन मालिका शोधून काढणं जरा कठीणच असत. कारण मालिकांच्या टीआरपीवरून त्या मालिकेची लोकप्रियता ठरते. साहजिकच टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी या मालिकांमध्ये रोज नवनवे ट्वीस्ट येतात. यातील काही अपेक्षित तर काही अनपेक्षित असतात. याचा परिणाम थेट TRP पॉइंट्सवर पडतो. म्हणून दर आठवड्याला प्रेक्षकांचा कल बदलंत जातो. चला तर या आठवड्यातील टीआरपी यादीतील टॉप १० मालिका कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

माझी तुझी रेशीमगाठ 7.7/10 IMDb 89% लोकप्रियता
हि मालिका सगळ्यात आघाडीवर आहेत. हि कथा यश आणि नेहाची आहे. यश एक श्रीमंत व्यापारी आहे. तर नेहा एक सिंगल आई. यशला खऱ्या प्रेमाचा शोध असतो आणि तो नेहाच्या प्रेमात पडतो. पण तिला हे सांगण्यासाठी त्याच्या जीवाचा आटापिटा करतो आणि पुढे जे काही होईल ते मालिकेत पाहता येईल.

आई कुठे काय करते 5.8/10 IMDb 80% लोकप्रियता
– अरुंधती आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करते. ती एक मुलगी, बायको, सून आणि आई आहे. पण जेव्हा तिला समजते की तिचे प्रयत्न समोरच्या व्यक्तींच्या अपेक्षांसमोर लहान समजले जात आहेत तेव्हा ती तिची वेगळी ओळख प्रस्थापित करण्यासाठी निघते.

सहकुटुंब सहपरिवार 6.7/10 IMDb 75% लोकप्रियता
– हि कथा एका कुटुंबाची आहे. हे कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी झगडणाऱ्या एका दांपत्याची आहे. सूर्यकांत आणि सरिता हे ते जोडपे. जे शांत आणि आनंदी जीवन जगतात. तथापि, ते त्याच्या भावांच्या भल्यासाठी त्यांची स्वप्ने आणि महत्वाकांक्षा त्याग करत असतात.

मुलगी झाली हो 3.1/10 IMDb 73% लोकप्रियता
– या मालिकेतून मुलगी नको असलेल्या प्रवृत्तीला ठेचण्याचा प्रयत्न केला आहे. यात भावनिक बांध आणि बाप लेकीचं घट्ट नातं यांचं दर्शन घडताना दिसत आहे.

फुलाला सुगंध मातीचा 4.6/10 IMDb 73% लोकप्रियता
– आयपीएस अधिकारी बनण्याची आकांक्षा असलेल्या एका तरुणीची मिठाईचे दुकान चालवणाऱ्या एका तरुणासोबत लग्न होते. कुटुंबियांना जेव्हा तिच्या शैक्षणिक पात्रतेची जाणीव करून दिली जाते तेव्हा त्रास होतो. मात्र यावर मात करून हि दोघे एकमेकांची साथ निभावतात.

सुख म्हणजे नक्की काय असत 3.7/10 IMDb 68% लोकप्रियता
– गौरी हि तरुणी शिर्के पाटील कुटुंबाची खाजगी नोकर म्हणून काम करत असते. सारेच तिच्याशी गैरवर्तन करीत असतात. पण जेव्हा त्यांचा एनआरआय मुलगा तिचा अपमान पाहतो तेव्हा तो तिच्याशी मैत्री करतो आणि यानंतर एका आकस्मिक गोष्टीमुळे त्यांचं लग्न होत.

ठिपक्यांची रांगोळी 6.2/10 IMDb 67% लोकप्रियता
– जेव्हा एखादी तरुणी एका मध्यमवर्गीय संयुक्त कुटुंबातील विद्वानांसोबत मार्ग ओलांडते तेव्हा दोघांच्याही आयुष्याला अनपेक्षित वळण लागते. असेच काहीसे या मालिकेचे कथानक आहे.

स्वाभिमान 4.5/10 IMDb 61% लोकप्रियता
हि मालिका बंगाली टीव्ही मालिका मोहोरचा अधिकृत रिमेक आहे. यातील आदिती, मेघना, नंदिता, पल्लवी, पल्लवीची आई वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या आहेत. ही एका स्त्रीची कथा आहे जी आत्मसमर्पण करण्याऐवजी कठीण मार्ग निवडते.

रंग माझा वेगळा 1.7/10 · IMDb ५७% लोकप्रियता
– ही कथा रंग आणि वर्णभेदावर आधारित आहे. सौंदर्या इनामदार या बिजनेस वुमनला काळ्या रंगाचा तिरस्कार असतो. अगदी माणसांमध्येही. तर दुसरीकडे तिचा मुलगा कार्तिक समंजस, हुशार आणि भेद न मानणारा. जो दीपा नावाच्या काळ्या सावळ्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि हि कथा सुरु होते.

स्टार प्रवाह धुमधडाका 1.2/10 IMDb52% लोकप्रियता
– मराठी टेलिव्हिजनवरील विविध सेलिब्रेटी यात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एकत्र आळायचे दिसत आहे. हि कोणती मालिका नसून हा एक शो आहे. ज्याच्या रिपीट टेलीकास्टलाही विशेष पसंती आहे.