Take a fresh look at your lifestyle.

तेव्हा साजिद खानने मला विवस्त्र व्हायला सांगितल ; ‘या’ मॉडेलचा धक्कादायक आरोप

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | मॉडेल पौलाने दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित पौलाने साजिदवर धक्कादायक आरोप केले आहेत. “मी टू मोहिमेदरम्यान मी गप्प बसले होते. कारण त्यावेळी इंडस्ट्रीत माझा कोणी गॉडफादर नव्हता आणि मला माझ्या कुटुंबीयांसाठी काम करणं गरजेचं होतं. पण आता मी माझ्यासाठीच कमावतेय. त्यामुळे आता उघडपणे सत्य बोलू शकते,” असं म्हणत पौलाने साजिदवर आरोप केले. पौला सतरा वर्षांची असताना साजिदने तिचं शोषण केलं, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं.

“साजिद मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. त्याने मला त्याच्यासमोर विवस्त्र व्हायला सांगितलं. हाऊसफुल चित्रपटात भूमिका देण्याच्या बदल्यात साजिदने मला विवस्त्र व्हायला सांगितलं. तेव्हा मी बोलू शकले नव्हते पण आता पुरे झालं. त्याला कारागृहात डांबलं पाहिजे”, अशी पोस्ट पौलाने लिहिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’