Take a fresh look at your lifestyle.

OTT’वर होणार मनोरंजनाचा बिग ब्लास्ट; ‘हे’ चित्रपट आणि सीरिज करणार फुल्ल Entertainment

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नवा महिना नवे चित्रपट आणि नवी सिरींजची मालिका घेऊन ओटीटी आपले मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे. या ऑगस्ट महिन्यात फुल्ल एंटरटेनमेंटसाठी तुम्हीही सज्ज व्हा. कारण या महिन्यात अनेक चित्रपट आणि विविध कथानकाच्या सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. जुलै महिन्यात रिलीज झालेले अनेक चित्रपट येत्या ऑगस्टमध्ये ओटीटीवर येत आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये चित्रपट चुकला तरीही मनोरंजन चुकणार नाही. चला तर जाणून घेऊया कोणकोणते चित्रपट आणि सीरिज ऑगस्टमध्ये मनोरंजनाचा धमाका करणार आहेत.

१) राष्ट्रकवच ओम – अभिनेता आदित्य रॉय कपूरचा ‘राष्ट्रकवच ओम’ हा चित्रपट १ जुलै २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही बरा असा चालला नाही. यानंतर आता हा चित्रपट OTT Zee5 वर येत्या १ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

२) डार्लिंग्स – जसमीत के रेन दिग्दर्शित आणि आलिया भट्ट निर्मित, अभिनित ‘डार्लिंग्स’ हा एक कॉमेडी थ्रिलर ड्रामा आहे. जो OTT नेटफ्लिक्सवर येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलियाशिवाय विजय वर्मा, शेफाली शाह, रोशन मॅथ्यू, विक्रम, इयाना चौधरी हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

३) व्हिक्टिम – ‘व्हिक्टिम’ हा चित्रपट एक ॲक्शन थ्रिलर ड्रामा असून तमिळ अँथॉलॉजी फिल्म आहे. हा चित्रपट येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी OTT प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. व्यंकट प्रभू, पा रंजित, एम राजेश आणि चिंबू देवन यांनी अँथॉलॉजीचे चार खंड दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटात प्रसन्ना, आमला पॉल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

४) खुदा हाफिज 2 – अभिनेता विद्युत जामवाल याचा नवा चित्रपट खुदा हाफिज 2 हा ८ जुलै २०२२ रोजी रिलीज झाला. पण दुर्दैव म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर आता ओटीटीवर विद्युत जामवालचा हा चित्रपट येत्या ८ ऑगस्ट २०२२ रोजी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

५) आय एम ग्रुट – मार्व्हल स्टुडिओजची नवीन सीरिज ‘आय एम ग्रूट’ येत्या १० ऑगस्ट २०२२ रोजी OTT डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे. अनेक मार्व्हल चित्रपटांमध्ये दिसणार्‍या ग्रुट नावाच्या पात्रावर आधारित हि एक संपूर्ण सीरिज आहे. त्याचा पहिला भाग या महिन्यात प्रदर्शित होतोय.

६) इंडियन मैचमेकिंग 2 – नेटफ्लिक्सच्या इंडियन मॅचमेकिंग या रिॲलिटी शोचा दुसरा सिझन लवकरच सुरु होतोय. येत्या १२ ऑगस्ट २०२२ रोजी हा सीजन रिलीज होणार आहे.

७) हिट द फर्स्ट – गेल्या १५ जुलै २०२२ रोजी अभिनेता राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा ​यांचा चित्रपट ‘हिट द फर्स्ट’ प्रदर्शित झाला. यानंतर आता येत्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट प्रदर्शित होतोय. यामध्ये राजकुमार, सान्या यांच्याशिवाय जतिन गोस्वामी, अखिल अय्यर, मिलिंद गुणाजी, शिल्पा शुक्ला, दलीप ताहिल आणि संजय नार्वेकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

८) शाबाश मिथू – लोकप्रिय महिला क्रिकेटर मिताली राजच्या जीवनावर आधारित बायोपिक चित्रपट शाबाश मिथू १५ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. यानंतर आता हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२२ रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मिताली राजची भूमिका तापसी पन्नूने साकारली आहे.

९) द वॉरियर – एन.लिंगू स्वामी दिग्दर्शित ‘द वॉरियर’ हा अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राम पथोनेनी पोलिसाच्या मुख्य भूमिकेत आहे.

१०) शी- हल्क – ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मधील सर्वात शक्तिशाली ‘हल्क’ची बहिण ‘शी- हल्क’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या १७ ऑगस्ट २०२२ रोजी भेटीला येत आहे. हि सिरीज इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

११) नेवर हॅव आय एव्हर – ‘नेव्हर हॅव आय एव्हर’ या सिरीजचा पहिला सिझन २०२० मध्ये रिलीज झाला तर दुसरा सिझन २०२१ मध्ये. यानंतर आता या लोकप्रिय सीरिजचा तिसरा सीझन येत्या १९ ऑगस्ट २०२२ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

१२) एंडोर – द स्टार वार्स – ‘स्टार वॉर्स’मधील पहिला सिझन एंडोर – द स्टार वॉर्स हा आहे लवकरच रिलीज होणार आहे. हि सिरीज OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर ३१ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.