Take a fresh look at your lifestyle.

OTT घेऊन येतोय मनोरंजनाचा तडका; एकाच आठवड्यात होणार एकापेक्षा एक सिरीजचा धमाका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। OTT हा एक असा पर्याय आहे जो सगळ्यांसाठीच आजकाल हवाहवासा झाला आहे. कारण मनोरंजन हवे तर OTT हवाच ना. आजकाल अनेको चित्रपट आणि वेबसीरीज OTT च्या माध्यमातून प्रेक्षकांसाच्या भेटीस येताना दिसते. त्यामुळे नेटफ्लिक्स, वूट, डिस्ने प्लस हॉटस्टार, Amazon प्राइम व्हिडिओ यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा प्रत्येक पार्ट हा प्रेक्षकांसाठी नवा अनुभव असतो. तसे पाहता आता राज्यातील चित्रपटगृहे हळूहळू सुरु झाली आहेत पण तरीही लोकांचा OTTवर अधिक विश्वास निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आता ऑक्टोबर सुरु झालाय आणि OTTवर नवीन काही आलं नाही असं कस होईल. हा येणार आठवडा प्रेक्षकांसाठी अत्यंत मनोरंजक असणार आहेत कारण येत्या आठवड्यात एकापेक्षा एक जबरदस्त अश्या वेबसिरीज रिलीज होणार आहेत. कोणत्या? जाणून घ्या खालीलप्रमाणे :-

१) ‘द घोस्ट्स’ – ‘द घोस्ट्स’ हि सिरीज ८ ऑक्टोबर रोजी वूट सिलेक्टवर रिलीज होतेय. याची कथा एका स्वतंत्र पत्रकार आणि शेफवर आधारित आहे. जो एका मोठ्या घरात राहायला येतो आणि इथे त्यांना भूत भेटते. हि एक विनोदी सिरीज असून याचा ट्रेलर प्रेक्षकांना भारीच आवडला आहे.

२) ‘सेक्सी बीस्ट सीझन २’ – एक अनोखी आणि भारी संकल्पना घेऊन ‘सेक्सी बीस्ट सीझन २’ येत्या ७ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपण एखाद्याच्या/तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारावर प्रेम करू शकता का? डेटिंग शो पुन्हा एकदा काही वयोमर्यादा प्रश्न उपस्थित करेल.

३) रश्मी रॉकेट’ – बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर ‘रश्मी रॉकेट’ येत्या १५ ऑक्टोबर रोजी Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट एका छोट्या गावातील मुलीची अनोखी कथा आहे. जिला निसर्गाची खास भेट मिळाली आहे. हा चित्रपट नंदा पेरियासामी यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित आहे. याचे दिग्दर्शन आकाश खुराना दिग्दर्शित यांनी केले आहे.

४) ‘लिटिल थिंग्स ४’ – ‘लिटिल थिंग्स ४’ हि सिरीजदेखील लवकरच रिलीज होणार आहे. यापूर्वीचे तीनही सीजन प्रेक्षकांना अतिशय आवडल्यास आता निर्मात्यांनी त्याचा चौथा सीझन आणला आहे. ही सिरीज १५ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.