Take a fresh look at your lifestyle.

ते विचार करूनच बोलले असतील; कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या गोखलेंना अवधूत गुप्तेंचा पाठिंबा?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रनौतने अलीकडेच देशाच्या स्वातंत्र्यावर वादग्रस्त विधान केले होते. यात तिने म्हटले होते कि १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक होती, तर २०१४ मध्ये खरं स्वातंत्र्य मिळालं. यानंतर देशभरातून तिच्यावर टीकांचा वर्षाव झाला असताना मराठी ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांनी तिच्या वक्तव्याचे जाहीर समर्थन केले आणि नवा वाद ओढवून घेतला. त्यामुळे कंगनासोबत गोखलेंवरही टिकांचा मारा होत आहे. दरम्यान स्वर भास्कर आणि अतुल कुलकर्णी या कलाकारांनी गोखलेंच्या समर्थनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे निषेध केल्याचे समोर आले. यानंतर आता मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले कि, विक्रम गोखले आम्हाला वडिलांच्या स्थानी आहेत. ते विचार करूनच बोलले असतील.

त्याचे झाले असे कि, मुंबईत अवधूत गुप्ते यांना पत्रकारांकडून कंगना रनौतने केलेले वक्तव्य आणि याला विक्रम गोखले यांनी दिलेले समर्थन यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना अवधूत गुप्ते यांनी स्पष्टपणे सांगितले की, आमचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही. पुढे, विक्रम गोखले मोठे कलाकार आहेत. ते केवळ कलाकार म्हणून मर्यादित नाही.

विक्रमजी विचारवंत असून, त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे. ते आमच्या वडिलांच्या स्थानी आहेत. आम्ही त्यांचा खूप आदर करतो. ते जे काही बोलले असतील, ते विचार करूनच बोलले असतील, त्यांनी व्यक्त केलेले मत पूर्ण विचारांती असावे. त्यावर प्रतिक्रिया देण्याइतकी माझी पात्रता नाही, असे अवधूत गुप्ते यांनी सांगितले.

तसेच यावेळी बोलताना अवधूत गुप्ते यांनी कंगना रनौतच्या वादग्रस्त विधानावर कोणतीही प्रतिक्रिया देणे पूर्णपणे टाळले. यानंतर आता सोशल मीडियावर मात्र अवधूत गुप्तेंच्या प्रतिक्रियेबाबत वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. अनेक संतप्त नेटकऱ्यांनी म्हटले आहे कि, आता गुप्तेंनाही स्वातंत्र्य खुपतेय वाटतं.

तर काही नेटकरी म्हणाले, अप्रत्यक्षपणे कंगना आणि विक्रम गोखलेंना पाठिंबाच देताय तुम्ही. गोखलेंनी कंगनाच्या वक्तव्याला समर्थन दिल्याचे जाहीरपणे सांगितल्यानंतर मनोरंजन सृष्टीतून कुणीही याविषयी बोलण्यास पुढे आलेले नाही. मात्र अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट एएनआय चे एक वृत्त शेअर करत, पद्मश्री येतोय अशी खोचक टीका केली आहे.

तर मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी गोखलेंच्या नाव न घेता ट्विट करून निधन साधताना लिहिले कि, वयाचा आणि शहाणंपणाचा दुरान्वये संबंध नसतो.