Take a fresh look at your lifestyle.

‘हे’आहेत २०२० मधले लक्षवेधी मराठी चित्रपट!

मुंबई | यावर्षी मराठी चित्रपट रसिकांना भुरळ घालण्यासाठी अनेक मराठी चित्रपट येऊ घातले आहेत. येणाऱ्या आगामी चित्रपटांची पोस्टर्स लाँच करण्यात आली आहे .दिग्दर्शक समीर पाटील प्रेक्षकांसाठी ‘विकून टाक’ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठी मध्ये चंकी पांडे यांना घेऊन आले आहेत. चांदी पांडे सोबतच या चित्रपटात शिवराज वैचाल,राधा कुलकर्णी,समीर चौघुले,ऋषिकेश जोशी हि कलाकार मंडळीही असणार आहे.

vikun taak poster

संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी वेडिंग चा शिनेमा या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकले त्याला प्रेक्षकांकडून घवघवीत यश मिळाले. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शनासोबतच पटकथा लेखन आणि संगीत केले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरून असे लक्षात येत आहे कि बाप आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी कथा असणार आहे का हा प्रश्न सध्या रसिकांना निर्माण झाला आहे. या चित्रपट कोण कलाकार आहे ते अजून समोर आलेले नाही मात्र वेडिंगचा शिनेमाने रसिकांच्या मनावर भुरळ घातली होती त्याच प्रमाणे ‘एकदा काय झाले’ हा सिनेमा रसिकांची माने जिंकणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे.

ekada-kaay-jhala-movie-posters

नेहमीच आपल्या दमदार अभिनयने मनावर प्रेक्षकांच्या अधिराज्य गाजवणारे आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा आणि नात्यांच्या विषयाला हात घालणारी कथानक घेऊन येत आहेत अशोक सराफ आणि  पद्मिनी कोल्हापुरी. प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरी यांची जोडी प्रथमच प्रेक्षकांना दिसणार आहे;यांचा प्रवास प्रेक्षकांना किती भावतो हे बघणे मजेशीर ठरणार आहे.

 

गोल्डन गेट मोशन पिक्चर्स घेऊन येत आहे ‘मनमौजी’. या सिनेमात सायली संजीव असणार आहे . सायलीने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर टाकले . ती कोणत्या भूमिकेत असणार ते अजून समोर आलेले नाही तसेच तिच्या सोबत कोणता अभिनेता दिसणार हे देखील कळले नाही आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: