Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला अनंतात विलीन; बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 20, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
1.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवुड सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पामेला यांना १५ दिवसांपूर्वी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. न्यूमोनिया आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते. प्रकृती नाजूक असल्याने त्या आयसीयूत होत्या. गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती प्रचंड खालावली. काही काळ त्या व्हेंटिलेटरवर होत्या मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Yash Raj Films (@yrf)

यशराज फिल्म्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘जड अंतःकरणाने चोप्रा कुटुंबीयांना कळवायचे आहे की, ७४ वर्षीय पामेला चोप्रा यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार आज सकाळी ११ वाजता मुंबईत करण्यात आले आहेत. तुमच्या प्रार्थनेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. खोल दुःखाच्या आणि चिंतनाच्या या क्षणी गोपनीयतेची विनंती’. बॉलिवूड सिनेविश्वातील सेलिब्रिटींनी चोप्रा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत आधार दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान, विकी कौशल, कॅटरिना कैफ, जॉन अब्राहम, करण जोहर, सोनू निगम, श्रद्धा कपूर, राकेश रोशन, हृतिक रोशन, वैभवी मर्चंट अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी चोप्रा कुटुंबाच्या दुःखात सहभाग घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पामेला आणि यश यांचे १९७० साली लग्न झाले होते. पामेला यांचे पती यश चोप्रा यांचे ११ वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे पामेला आपल्या दोन मुलांसह अर्थात आदित्य आणि उदय चोप्रा यांच्यासमवेत राहत होत्या.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्यांची दोन्ही मुलं सिनेक्षेत्रात कार्यरत असून अभिनेत्री राणी मुखर्जी हि आदित्य चोप्रा यांची पत्नी आहे. त्यामुळे नात्याने राणी मुखर्जी पामेला यांची सून आहे. पामेला या प्रख्यात पार्श्वगायिका, लेखिका आणि निर्मात्या होत्या. पामेला यांच्या निधनवार्तेने संपूर्ण सिनेविश्व शोकात आहे.

Tags: aditya chopradeath newsInstagram Postrani mukharjiviral postYashraj films
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group