Take a fresh look at your lifestyle.

‘या’ हिंदी चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये होणार रिमेक…

0

चंदेरीदुनिया । यंदाचं वर्ष हे बॉलिवूडसाठी तसं साधारणच राहिलं. गेल्या दोन तीन वर्षांत बॉलिवूडने गाठलेला कमाईचा कोट्यवधींचा आकडा काही यंदा गाठता आला नाही. पण, वर्ष संपतानाच एक आनंदाची बातमी बॉलिवूडकरांना मिळाली आहे. कारण एका चित्रपटाचा आता हॉलिवूडमध्ये रिमेक होणार आहे. हा चित्रपट हॉलिवूड रिमेक बनणारा पहिला हिंदी चित्रपट असणार आहे.

हा चित्रपट आहे हृतिक रोशन अभिनित ‘सुपर 30’. गणिताचे प्राध्यापक आनंद कुमार यांच्या आयुष्यावरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस आणि समीक्षकांची पसंती मिळवली होती. आनंद कुमार यांच्या आयुष्यातील हे पैलू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हृतिक आणि निर्माता दिग्दर्शकांचं अभिनंदनही केलं होतं. या चित्रपटात हृतिक रोशन हा आनंद कुमार यांच्या भूमिकेत दिसला होता. तर मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठीही मुख्य भूमिकांमध्ये दिसले होते.

आता या चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये रिमेक होणार आहे. संजीव दत्ता या चित्रपटाचं लेखन करणार असून अद्याप प्रमुख भूमिकेसाठी कलाकाराचा शोध सुरू आहे. काही हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी सुपर 30चे निर्माते शुभाशिष सरकार यांच्याशी चित्रपटाच्या निर्मितीचे हक्क आणि रिमेकसंबंधी बोलणी केली होती. त्यामुळे लवकरच बॉलिवूडच्या ‘सुपर 30’चा हॉलिवूडपट झळकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: