Take a fresh look at your lifestyle.

..यंदा दिवाळीत खान स्वतःच रिलीज झाले; आर्यनच्या सुटकेनंतर राम गोपाल यांचा मिश्किल टोला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींपैकी एक ओळखले जातात. याचे कारण म्हणजे ते नेहमीच काही ना काही ट्विट करीत इंडस्ट्रीतील, शहरातील, राज्यातील वा देशातील लहानापासून मोठ्या मुद्द्यांची पिसं काढताना दिसतात. त्यांचा स्पष्टवक्तशीरपणा कधी कधी नडतो पण तरीही ते वेधडक वक्तव्य करताना आगापिछा पाहत नाहीत. आता बऱ्याच दिवसांनी राम गोपाल वर्मा यांनी बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या तुरुंगातून परतण्यावर मिश्किल ट्विट केले आहे. .

निर्माता राम गोपाळ वर्मा यांनी आपल्या धिकृत सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘बॉलिवुडमधील खानांच्या चित्रपटांच्या रिलीजसाठी राखीव असते. मात्र, यंदा दिवाळीत ‘खान’ स्वतः रिलीज झाले आहेत.’ आर्यन खानच्या घर वापसीनंतर शाहरुख खान, गौरी खान यांच्यासह खान कुटुंब आणि एकंदरच बॉलिवूडमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाहरुखचा बंगला ‘मन्नत’ तर दिवाळीआधीच रोषणाईने सजला होता. तर चाहत्यांनी ढोल वाजवून त्यांच्या लाडक्या प्रिन्स आर्यन खानचे स्वागत केले.

दरम्यान आर्यनला तुरुंगातून घरी आणण्यासाठी शाहरुखचा खात्रीलायक आणि विश्वासू अंगरक्षक रवी हा आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. यानंतर आर्यन घरी पोहोचला. मात्र या प्रकरणामुळे सध्या सोशल मीडियावर आर्यन खान या नावाचा ट्रेंड भलताच गाजताना दिसतोय. चाहते आणि ट्विटर युजर्स आर्यन आणि शाहरुखचे अभिनंदन करत आहेत. यासोबतच आर्यन खानच्या स्वागतासाठी भावनिक आणि आनंदी ट्विटही पाहायला मिळाले. पण अहत्वाचे असे कि आर्यन केवळ जामिनावर सुटला आहे. प्रकरणातून तो अद्याप सुटला नाही. आर्यन खानला एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. यानंतर २८ ऑक्टोबर २०२१ रोजी उच्च न्यायालयाने आर्यन खानला १४ अटींवर जामीन मंजूर केला होता. यानंतर आता लवकरच आर्यन ला श्शरुख मन्नतपासून पुन्हा लांब करणार असल्याची चर्चा आहे.