हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाहिनीचा दर्जा टिकवायचा असेल तर टीआरपीच्या शर्यतीत कायम सक्रिय यासाठी विविध चॅनेल विविध शक्कल लढवीत असतात. तर आता झी मराठी या लोकप्रिय वाहिनीने प्रेक्षकांचे लक्ष पुन्हा एकदा वेधून घेण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. आतापर्यंत या वाहिनीने अनेक दर्जेदार मालिका दिल्या आहेत. ज्यांपैकी २ मालिका आता लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामध्ये ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या मालिका TRP लेव्हल वाढविण्यासाठी पुन्हा एकदा प्रसारित होणार आहेत.
‘होणार मी सून ह्या घरची’ या मालिकेतील श्री आणि जान्हवी या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच भुरळ घातली होती. त्यामुळे मालिका संपूर्ण तब्बल ७ वर्षे उलटली असली तरीही या जोडीचं क्रेझ कायम आहे. त्यामुळे हि मालिका आता पुन्हा प्रसारित होणार आहे. या बातमीने प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे. खरंतर मालिकेचा पुढील भाग येतोय का काय..? असे अनेकांना वाटले होते. मात्र असे नसून होऊन गेलेले कथानकच पुन्हा पहायला मिळणार आहे. येत्या १३ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ४ वाजता हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
फक्त ‘होणार सून मी ह्या घरची’ हि मालिकाच नाही तर सुयश टिळक आणि सुरुची अडारकर यांची ‘का रे दुरावा’ हि मालिका देखील तुफान गाजली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहून हि मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेचे प्रसारण देखील येत्या १३ फेब्रुवारी २०२३ पासून संध्याकाळी ५ वाजता झी मराठीवर होणार आहे. अशाप्रकारे झी मराठीच्या गाजलेल्या २ मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकांचे कथानक पाहिलेले असले तरीही प्रेक्षकांमध्ये या मालिका पुन्हा पाहण्याची उत्सुकता आहे.
Discussion about this post