Take a fresh look at your lifestyle.

..हे घृणास्पद आहे; युक्रेनमध्ये भारतीयांसोबत होणाऱ्या वर्णभेदावर सोनम कपूर संतापली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनविरुद्ध शंख फुंकले. यानंतर जे युद्ध सुरु झाले आहे ते अद्याप कायम आहे. दरम्यान कित्येक नागरिकांचे नाहक बळी गेले. शहरे उध्वस्त झाली. लोकांचा आक्रोश आणि किंचाळ्यांनी एक देश सुखावत आहे तर एक देश उध्वस्त होताना सर्व पाहत आहेत. दरम्यान रशियाकडून युक्रेनवरील आक्रमण सुरूच असताना युद्धग्रस्त सुमी शहरात ७०० भारतीय विद्यार्थी सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान त्या मुलांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एक मोठी बाब लक्षात आली कि, त्यांच्यासोबत वर्णभेद केला जात आहे. ते हि आताच्या काळात. हे पाहून बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर चांगलीच संतापली आहे.

sonam kapoor

युद्धग्रस्त सुमी शहरात ७०० भारतीय विद्यार्थी सुटकेच्या प्रतीक्षेत असताना त्यांना ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखलं जात आहे आणि याचे कारण आहे वर्ण. शिवाय स्थानिक दुकानदारांकडून देखील मुलांना अशीच काहीशी वागणूक मिळत आहे हे मुलांनी शेअर केलेल्या व्हिडिओत पहायला मिळाले. यासंदर्भातील वृत्तावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री सोनम कपूरने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हे वृत्त शेअर केलं आहे. सोबत वर्णभेदावर संतापतो व्यक्त केला आहे.

“रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना वारंवार विनंती करूनही सुमी या पूर्व युक्रेनियन शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार झालेला नाही. यामुळे भारताने आपल्या मुलांबाबत चिंता व्यक्त केली आहे आहे. दरम्यान अशा युद्धग्रस्त सुमीमधील ७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी जीव मुठीत घेऊन सुटकेच्या प्रतीक्षेत असताना वर्णभेदाचे शिकार होणे अतिशय घृणास्पद बाब आहे, असं वृत्त सोनमने शेअर केलं. यावर प्रतिक्रिया देताना तिने लिहिलं कि, ‘भारतीयांना या लढाईच्या दोन्ही बाजूंनी वर्णद्वेषाचा सामना करावा लागत आहे. कृष्णवर्णीयांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते ते घृणास्पद आहे. बातम्यांमध्ये तरी हेच पहायला मिळतंय.’