Take a fresh look at your lifestyle.

शूटनंतर गाड्यांना हात लावायला म्हणूनच घाबरतो हा अभिनेता

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ‘जेम्स बॉण्ड’ म्हटलं की आपल्या समोर येतं ते त्याच्या महागड्या गाड्या आणि त्यावरील जबरदस्त एक्शन सीन्स. जेम्स बॉण्डचे एक्शन सीन्स पाहून आपण थक्क होतो. असं वाटतं की बॉण्ड किती भाग्यवान आहे. त्याला जगातील अत्यंत महागड्या गाड्यांमधून फिरता येते. वाट्टेल तशे स्टंट त्याला त्या गाड्यां वर करता येतात, शिवाय विचारणारं पण कोणीच नाही. एक गाडी खराब झाली की लगेच त्याला दुसरी गाडी मिळनार.पण रिअल आयुष्यात मात्र जेम्स बॉण्ड त्याच्या चित्रपटातील गाड्यांना स्पर्श देखील करत नाही.

जेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘नो टाईम टू डाय’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जेम्स बॉण्ड हे पात्र साकारणारा अभिनेता डॅनियल क्रेग याने नुकत्याच एका मुलाखतीत या चित्रपटातील गाड्यांबाबत एक खुलासा केला आहे. तो म्हणाला,

“चित्रपटात प्रेक्षकांना एस्टर्न मार्टिन DB11, एस्टर्न मार्टिन व्हिंटेज, फोर्ड मस्टँग यांसारख्या अनेक महागड्या गाड्या दिसतात. परंतु चित्रीकरण संपताच त्या गांड्यांकडे मी बघतही नाही. कारण ‘स्कायफॉल’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना माझ्याकडून ‘एस्टर्न मार्टिन DB 5’ या गाडीचे प्रचंड नुकसान झाले होते. या गाडीच्या दुरुस्तीसाठी तब्बल आठ कोटी रुपये इतका खर्च झाला होता. त्यावेळी माझ्या मानधनातून हे पैसे निर्मात्यांनी कापले होते. परिणामी माझ्या मानधनातली जवळपास ३० टक्के रक्कम मी एका गाडीच्या दुरुस्तीसाठी दिली होती. शिवाय त्यावेळी निर्मात्यांनी स्टंटचे दृश्य चित्रीत होताच गाडीला हात न लावण्याची मला सक्त ताकित देखील दिली होती. तेव्हापासून मी मनाशी गाठ बांधली की दृश्य चित्रीत होताच जेम्स बॉण्डच्या गाडीला स्पर्श देखील करणार नाही.” असे डॅनियल क्रेग या मुलाखतीत म्हणाला.