Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

टायगर श्रॉफला ॲक्शन सीन पडला भारी; शूटिंग दरम्यान पायाला गंभीर दुखापत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 31, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tiger Shroff
0
SHARES
114
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीमध्ये स्वतःहून ॲक्शन सीन करणारे फार कमी कलाकार आहेत. यामध्ये आवर्जून अक्षय कुमारचे नाव घेतले जाते. यानंतर आता टायगर श्रॉफदेखील स्वतःचे ॲक्शन सीन स्वतःच करण्यासाठी प्रसिद्ध आहे. उत्तम फिटनेससह तो उत्तम डान्स आणि उत्तम ॲक्शन सीन्स देतो. आतापर्यंत त्याने केलेल्या चित्रपटांमधील त्याच्या पात्राचे ॲक्शन सीन कोणत्याही डुप्लिकेटने नव्हे तर त्याने स्वतः केले आहेत. सध्या त्याने सोशल मीडियावर अशाच एका ॲक्शन सीनच्या शूटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. पण यावेळी मात्र त्याला ॲक्शन सीन करणे प्रचंड महागात पडले आहे.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

अनेकदा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीन करतांना छोटे मोठे अपघात हे होतचं असतात. त्यामुळे संपूर्ण टीम यासाठी आधीच तयार असते. असाच एक अपघात टायगरसोबतसुद्धा घडला आहे. पण या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर येत आहे. याबाबत त्याने स्वतःच माहिती दिली आहे. टायगरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवर एक व्हिडिओ शेअर केलाय. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘काँक्रीट वॉश बेसिन तोडताना माझा पाय मोडला. मला जितकं वाटत होतं त्यापेक्षा मी अधिक मजबूत आहे. पण माझ्या बचावात बेसिनही तुटले.’

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

या व्हिडिओमध्ये टायगर जबरदस्त अ‍ॅक्शन सीन करताना दिसतोय. दरम्यान, त्याच्या समोरील व्यक्ती आपल्या बचावासाठी काँक्रीटचे वॉश बेसिन आणतो आणि टायगरने ते पायाने तोडतो. या नादात त्याच्या पायाला इजा पोहोचते. टायगरने शेअर केलेल्या या व्हिडिओवर त्याचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करीत त्याच्या तब्येतीची विचारपूस करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर दिग्दर्शक साबीर खानने लिहिले आहे, ‘या दिवशी आम्ही २४ तास शूटिंग केले. खूप भयानक’ या कमेंटवरून हा व्हिडीओ जूना आहे हे समजत आहे. दिग्दर्शक साबीर खान आणि टायगर यांनी ‘हिरोपंती’, ‘मुन्ना मायकल’ आणि ‘बागी’ या चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. यानंतर आता लवकरच टायगर अक्षय कुमारसोबत ‘गणपथ’ आणि त्यानंतर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Tags: bollywood actorInjury During shootInstagram Accounttiger shroffViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group