Take a fresh look at your lifestyle.

टायगर श्रॉफच्या आगामी गणपथ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित ; ‘या’ जबरदस्त अंदाजात दिसणार टायगर

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडमध्ये आपल्या ऍक्शन सीन मुळे लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण करणार्‍या टायगर श्रॉफकडे एकामागून एक असे अनेक प्रोजेक्ट येणार आहेत. नुकताच त्याने त्याच्या आगामी ‘गणपथ’ या चित्रपटाची घोषणा करणारे चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. हे पोस्टर रिलीज होताच टायगर श्रॉफने आपण या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असल्याची माहिती दिली आहे. मोशन पोस्टर पाहून तुम्ही अंदाज बांधू शकता की टायगर श्रॉफच्या या नव्या चित्रपटामध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळेल.

टायगरने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये पुन्हा एकदा त्याचा अॅक्शनपॅक अवतार पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मोशन पोस्टरमध्ये टायगरचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.”जब अपून डरता हैं ना, तब अपून बहोत मारता हैं”, असा डायलॉग टायगर म्हणताना दिसत आहे.

“मी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची कथा थोडी वेगळी आहे. या चित्रपटासाठी माझी, जॅकी भगनानी आणि विकास बहल यांच्यासोबत अनेकदा चर्चा झाली. मला चित्रपटाची कथा विशेष आवडली असून विकाससोबत काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे”, असं टायगर म्हणाला.

दरम्यान, विकास बहल दिग्दर्शित ‘गणपथ’ या चित्रपटाचं चित्रीकण जून किंवा जुलै २०२१ मध्ये सुरु होणार असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या टायगरच्या नावावरचा पडदा जरी दूर झाला असला तरी त्याच्यासोबत अजून कोणते कलाकार झळकणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.