Take a fresh look at your lifestyle.

‘गणपथ’च्या शूटिंगदरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत; इंस्टास्टोरीवर फोटो केला पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आणि आत्ताच आघाडी अभिनेता टायगर श्रॉफ याने ‘गणपथ: १’ या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यानंतर त्याच्या चाहत्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट पूर्ण अॅक्शन मुव्ही असणार आहे आणि यातील टायगरचा लूकसुद्धा एकदम किल्लर आहे. या चित्रपटात क्रिती सॅनन टायगरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. आता अॅक्शन मुव्ही म्हणजे अॅक्शन सीन्स आले. अश्याच अॅक्शन सीन्सच्या शूटिंगदरम्यान टायगरच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करीत याची माहिती दिली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ हा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक बारीक गोष्ट आणि येणाऱ्या नव्या कोऱ्या प्रोजेक्टची माहिती तो आपल्या चाहत्यांना देत असतो. दरम्यान गणपथ चित्रपटाच्या शूटिंग सेटवर अॅक्शन सीन करताना टायगर जखमी झाला आहे. त्याच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे आणि त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा काळानिळा सुजलेला डोळा स्पष्ट दिसत आहे. या फोटोसोबत टायगरने कॅप्शन दिले आहे कि, “शिट घडलंच.. #गणपथ फायनल काउंटडाउन”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

‘गणपथ: १’मध्ये टायगर आणि क्रिती हे मुख्य भूमिकेत आहेत. यांच्या व्यतिरिक्त एली अवराम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात टायगर एका बॉक्सरच्या भूमिकेत आहे. तर त्याचे ऑनस्क्रीन वडील देखील त्याच्या आधीच्या काळात बॉक्सर होते. त्याची हि व्यक्तिरेखा स्क्रिप्टचा एक महत्त्वाचा भाग आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र तरीही अजून हे शूट सुमारे दोन महिने चालण्याची अपेक्षा आहे, असे सूत्रांकडून मिळाल्या माहितीत सांगितले आहे.