हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । विविध विषयांवर नेहमीच परखड मत मांडणाऱ्या कंगना रनौत हिने आता भारत आणि चीन सीमेवरील वादावरून आपले मत व्यक्त केले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून चीनला घडा शिकवला पाहिजे अशा आशयाचा व्हिडीओ बनविला आहे. यावेळी तिने सर्वाना उद्देशून चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सांगितले आहे. तसेच हे युद्ध आपले सर्वांचे आहे असेही ती म्हणाली आहे.
‘जर कुणी आपल्या हाताची बोटे कापण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या बाजूपासून आपले तळवे कापण्याचा प्रयत्न करेल, तर आपल्याला ज्याप्रकारचा त्रास होईल नेमका तसाच त्रास आपली स्वार्थी नजर लडाख वर टाकून चीनने दिला आहे. आपल्या सीमेचा एक एक इंच भाग वाचविण्यासाठी आपले २० सैनिक शहिद झाले आहेत. त्यांच्या आईचे, विधवा पत्नीचे अश्रू आपण विसरू शकतो का? सैन्याचे सीमेवर होणारे युद्ध हे केवळ सैन्याचे किंवा सरकारचे असते हा विचार करणे योग्य आहे का? त्यात आपली काहीच भूमिका नाही का?’ असे प्रश्न तिने या व्हिडिओत विचारले आहेत.
View this post on Instagram
“We have to stand together, unite, and collectively fight this war against China!” #अब_चीनी_बंद
‘महात्मा गांधी यांनी सांगितले होते. जर ब्रिटाशांना कमकुवत करायचे असेल तर त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घातला पाहिजे अगदी त्याप्रमाणेच आता चीनवर बहिष्कार घातला पाहिजे. आपल्याच देशात नफा कमवून त्यातून शस्त्रास्त्रे बनवून ते सीमेवर आपल्या जवानांशी लढतात. त्यामुळे आता चीनला धडा शिकविला पाहिजे.’ असे ती म्हणाली आहे. कंगना रनौत आपल्या सोशल मीडियावर सतत कार्यरत असते. आपले मत ती या माध्यमातून मांडत असते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.