Take a fresh look at your lifestyle.

आजचे स्वरूप दुर्गा परमेश्वरी; अपूर्वाच्या नवरात्री स्पेशल फोटोशूटला चाहत्यांची विशेष पसंती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज नवरात्रीचा तिसरा दिवस. अर्थात आजची तिसरी माळ. शक्ती स्वरूपाच्या या अध्यात्मिक उत्सवात सर्वत्र लोक मनोभावे स्त्री शक्तीची पूजा अर्चना करताना दिसतात. कारण नवरात्र हा उत्सव अत्यंत खास मानला जातो. यातील प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. या निमित्ताने दरवर्षी काही अभिनेत्री नवरात्र स्पेशल फोटोशूट करतात. शक्तीची नानाविध रूप साकारून त्या आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधताना दिसतात. असेच काहीसे फोटोशूट यंदा अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने केले आहे.

अभिनेत्रीने केलेल्या या फोटोशूटच्या माध्यमातून ती नेहमीच विविध ठिकाच्या शक्तिपीठांची रूपे अनोख्या ढंगात आपल्या चाहत्यांसमोर प्रकट करत आहे. आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिने जया दुर्गा परमेश्वरी मातेचे रूप धारण केले आहे. हे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अधिकृत हँडलवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, नवरात्रीचा तिसरा दिवस! रंग – करडा. देवी- जया गौरी दुर्गा परमेश्वरी. जया दुर्गा परमेश्वरी मंदिर कर्नाटकात उडपी येथे आहे अंबा परमेश्वरी,चामुनडेश्वरी,ओम शक्ति, दुर्गा, सरस्वती, काली अशी तिची रूपे आहेत. स्कंध पुराणात याचा उल्लेख आहे..मी अणि माझ्या टीमने केलेला ऐक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

याआधी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अपूर्वाने कोल्हापूर, करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीचे स्वरूप धारण केलेले फोटो शेअर केले होते. यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिने मुंबापुरीची ग्रामदेवता मुंबादेवीचे स्वरूप धारण केलेले फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोशूटला प्रचंड पसंती मिळत असून अनेकांनी तिच्या फोटोंमधून देवी आईचे दर्शन घडल्याचे म्हणत तिचे व तिच्या टीमचे कौतुक केले आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हि झी मराठीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेमध्ये शेवंता हे पात्र साकारते आहे आणि लोकांचे तिचे हे पात्र इतके भावले आहे कि तिला शेवंता म्हणून ओळखणाऱ्या चाहत्यांची संख्या अधिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.