Take a fresh look at your lifestyle.

टॉप १० : २०१९ चे छप्परफाड कमाई करणारे चित्रपट

हॅलो बॉलिवूड, विशेष । २०१९ हे वर्ष बॉलीवूडसाठी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवणारं ठरलं. प्रस्थापित स्टार मंडळींना अपेक्षेपणाने मोठं कर्तब दाखवता आलं नाही, नवख्या, तरुण, उदयोन्मुख स्टार मंडळींनी बॉक्स ऑफिस गरम ठेवलं. आयुष्यमान खुराणाने तीन चित्रपटांसह नवीन बॉक्स ऑफिस किंग म्हणून जम बसवू पाहिला तर अक्षय कुमारने आपली जादू कायम ठेवत कमाईत नियमितता ठेवली.

या वर्षीच बॉक्स ऑफिस कलेक्शन चाहत्यांच्या, पर्यायाने बॉलीवूडच्या बदलत्या वाऱ्याची झलक दाखवणार आहे. स्टार पॉवर च्या उपर जाऊन चित्रपटाची गोष्टच पुन्हा एकदा प्रकाश झोतात येत असल्याचे बघून समाधान वाटतं.

खालील कमाई ही फक्त हिंदी भाषेत रिलीज झालेल्या आणि भारतातील Top 10 गल्ल्यांची आहे.

१०. छिछोरे – 153.09

९. टोटल धमाल – 154.23

८. केसरी – 154.41

७. गली बॉय – 140.25

६. हाउसफुल ४ – 194.60

५. मिशन मंगल – 202.98

४. भारत – 211.07

३. उरी – द सर्जिकल स्ट्राईक – 245.36

२. कबीर सिंग – 278.24

१. वॉर – 317.91 करोड

Comments are closed.