आग्रहाचं आमंत्रण! सोनाली- कुणालच्या लग्नाचे मंगलमय क्षण पहा Planet मराठीवर; पहा टिझर
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर भारी ऍक्टिव्ह असते. त्यामुळे तिच्या आयुष्यात काय घडतंय हे तीच सोशल हँडलच सांगत असत. गेल्या वर्षी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. पण कोविडमुळे तिला हे लग्न साधेपणाने करावे लागले. यानंतर काही महिन्यांपूर्वी ती पुन्हा आपल्या पतीसोबत पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्यांनी हा लग्नाचा घाट घातला. या सोहळ्याचे फोटो व्हिडीओ मात्र तिने शेअर केले नव्हते. पण आता तिच्या लग्नातील एकूण एक क्षणाचे तुम्हीही साथीदार होऊ शकता. कारण प्लॅनेट मराठी ओटीटीवर हा लग्नसोहळा प्रसारित केला जाणार आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने याबाबत तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सच्या माध्यमातून हि माहिती चाहत्यांना दिली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या लग्नाचे दोन चेहरा न दिसणारे फोटोसुद्धा शेअर केले आहेत. यातील एका फोटोत कुणालने सोनालीचा हात हातात घेतल्याचे पहायला मिळतेय. तर दुसऱ्या फोटोत सोनाली सप्तपदी चालताना दिसतेय. फक्त त्या दोघांचे चेहरे दिसत नाहीत. पण त्यांचे हे फोटो त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओची उत्सुकता आणखीच वाढवत आहेत यात काही शंकाच नाही.
या फोटोला कॅप्शन देताना तीने लिहिलंय कि, “07.05.2022. ते. 11.08.2022…, राखून ठेवलेले हे क्षण, साठवून ठेवायला फक्त ६ दिवस बाकी”. यासोबतच तिने SonaleeKunalAWeddingStory on प्लॅनेट मराठी, 11 ऑगस्ट. यासोबत तिने SonaleeKunal, kenosona, sonaleekulkarni, kunalbenodekar असे विविध हॅशटॅगही दिले आहेत. यासोबत तिने स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनाली आणि कुणाल शुभविवाह असे लिखित पत्रिकेत दिसत आहे. या टीझरने आधीच प्रेक्षकांची उत्कंठता प्रचंड वाढवली आहे. आजपासून सहाव्या दिवशी हा लग्न सोहळा आपण प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकणार आहोत. सोनाली- कुणालचा हा विवाहसोहळा नेमका कसा पार पडला..? हे आता डिजिटल माध्यमातून सगळ्यांना पाहता येणार आहे.