Take a fresh look at your lifestyle.

शाहरुख खानच्या नावावर ट्रॅफिकिंगचा धंदा; पोलिसांच्या कारवाईत सत्य आले समोर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्री चांगलीच चर्चेत आहे. कधी ह्या कारणामुळे तर कधी त्या कारणामुळे बॉलिवूडवर सर्रास चिखल फेक केली जात आहे. मुळात बॉलिवूड एक मायानगरी आहे. त्यामुळे बॉलिवूडकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे. अनेक लोकं दररोज मुंबईत येतात ती फक्त आणि फक्त बॉलिवूड मध्ये हिरो किंवा हिरोईन होण्यासाठी आणि मग जे घडते त्याला म्हणतात कालचक्राची सुरुवात. बॉलीवूडने अनेकांना मोठे केले. तर अनेकांना अक्षरशः झोपवले. अलीकडेच प्रसिद्ध उद्योजक आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यानंतर आता आणखी एक चुकीचा व्यवहार बॉलिवूडच्या नावावर सुरु असल्याचे समोर आले आहे आणि यात श्शरुख खानचे नाव समोर आले आहे, हि थोडी धक्कादायक बाब आहे.

ANIच्या रिपोर्टनुसार, एक व्यक्ती मुलींना खोटी माहिती देऊन ट्रॅफिकिंग करत होता. ही व्यक्ती सोशल मीडियावर स्वतःला इव्हेंट मॅनेजर म्हणवतो. तर मुलींना बॉलिवूडचा किंग खान शाहरूखच्या चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देतो. दरम्यान पश्चिम बंगालमधून आणलेल्या १७ वर्षीय मुलीला मुंबईत रेस्क्यू करण्यात आले आहे. मुंबईतील दादर स्टेशनवर जीआरपीच्या एस आय ज्ञानेश्वर कटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,’जीआरपीने १७ वर्षीय एका मुलीला रेस्क्यू केले आहे. मुख्य म्हणजे, या मुलीला शाहरूख खानच्या चित्रपटात काम देण्याचे आश्वस्त करून पश्चिम बंगालहून मुंबईत आणले आहे. सोशल मीडियावर स्वतःला इव्हेंट मॅनेजर सांगून हि व्यक्ती अनेको मुलींना फसवत असे. मात्र आता या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे’.

बॉलिवूड मधील बड्या कलाकाराच्या नावावर या अशा गोष्टी आज पहिल्यांदा समोर आल्या आहेत असे काही नाही. या अगोदरही अशा गोष्टी कित्येकदा कित्येक कलाकारांच्या नावावर सुरु असल्याचे समोर आले आहे. बॉलिवूडच्या चकाकत्या जगतात लोकप्रिय आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी लोकांचे स्वप्न असते आणि याच स्वप्नाचा फायदा घेत बड्या कलाकारांच्या नावावर तरुण मुलींचे ट्रॅफिकिंग केले जाते. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचे नाव घेण्यात आले आहे मात्र त्याचा या प्रकरणाची काहीही संबंध नाही. शाहरुखच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं तर, तो लवकरच ‘पठाण’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. मात्र अद्याप या चित्रपटाचे पोस्टर किंवा अन्य बाबी समोर आलेल्या नाहीत.