Take a fresh look at your lifestyle.

..तो मर्द को किस बात का गुरुर? ‘गंगुबाई काठियावाडी’चा ट्रेलर चर्चेत; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी हा गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. यानंतर आता अखेर हा चित्रपट रिलीज होऊ घातला आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर सर्वत्र प्रदर्शित झाला असून चांगलाच चर्चेत आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. मुख्य म्हणजे या ट्रेलरमध्ये आलियाच्या बोल्ड अवतार पाहून तिच्या या लूकमुळे अनेकांच्या नजर तिच्यावर खिळल्या आहेत. शुक्रवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आज १० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि लाईक या ट्रेलरने मिळवले आहे. यात सगळ्यात लक्षवेधी ठरतोय आलियाच्या बोल्ड लूक आणि चित्रपटातील रोमँटिक सीन्स.

हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर यावर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अनेकांनी आलियाच्या नव्या आणि वेगळ्या लुकचे भरभरून कौतुक केल्याचे दिसून आले आहे. याशिवाय अनेकांनी तिच्या अभिनयाची देखील तारिफ केली आहे. आलियाच्या चाहत्यांनी तिला याआधी रोमॅन्टिक सीन करताना पाहिलं आहे. पण पहिल्यांदाच एका वेगळ्या आव्हानात्मक भूमिकेत पाहणार असल्यामुळे तिची हि बोल्ड भूमिका जास्त भावणारी असल्याचे म्हटले आहे. आलियाच्या गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट ६ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा चित्रपट रखडला.

गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारतेय. तर अजय देवगण यात गँगस्टर करीम लालाच्या भूमिकेत दिसतोय.

ट्रेलरमध्ये आलियाच्या लुकसह तिच्या दमदार संवादांमुळे ती जास्त चर्चेत आली आहे. संजय लीला भन्साळी यानी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.हा चित्रपट मध्यंतरी वादातदेखील सापडला होता. गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यात कोरोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला आणखीच वेळ लागला. मात्र अखेर हा चित्रपट आता प्रदर्शित होणार असल्याची घोषणा झाली असून फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा गाजवण्यास सज्ज आहे.