संजय दत्तच्या ‘तुलसीदास जुनियर’चा दर्जेदार ट्रेलर रिलीज; पहा व्हिडीओ
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, दिवंगत राजीव कपूर, आणि बालकलाकार वरुण बुद्धदेव यांच्या प्रमुख भूमिका असलेला तुलसीदास ज्युनियर हा चित्रपट येत्या ४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राजीव कपूर यांचा हा शेवटचा चित्रपट असून त्यांनी आतापर्यंत बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट दिलेल्यांपैकी हा चित्रपट एक ठरेल. या तुलसीदास ज्युनियर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच लगेच चर्चेत आला आहे.
तुलसीदास जुनिअर या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, आशुतोष गोवारीकर आणि सुनीता गोवारीकर यांनी केली आहे. तर मृदूल यांनी या चित्रपटाची कथा लिहीली असून त्याचे दिगदर्शनही केले आहे. तुलसीदास जुनियर हा चित्रपट एका १३ वर्षीय मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. हा मुलगा स्नूकर या खेळात आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेतो. हा चित्रपट एक दर्जेदार क्रीडा संबंधित कथानकाशी संबंध ठेवतो. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून अनेक प्रेक्षकांनी यावर पसंती दर्शवली आहे.
हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी चित्रपटाच्या कथेला नावाजले आहे तर अनेकांना कलाकारांची अभिनय शैली आवडल्याचे दिसून येत आहे. शिवाय हं चित्रपट राजीव कपूर यांचा शेवटचा चित्रपट असल्यामुळे त्यांचे चाहते देखील या चित्रपटाविषयी उत्सुक आहेत. गेल्या वर्षी ९ फेब्रुवारी २०२१ रोजी राजीव कपूर यांचे निधन झाले. राजीव कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली’, ‘प्रेम गाथा’, ‘हीना’, ‘नाग नागिन’, ‘एक जान है हम’ आणि ‘आ अब लौट चलें’ यांसारख्या बहारदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती.