‘भागो.. मंजुलिका इज बॅक’; ‘भुलभुलैय्या 2’चा हॉरर कॉमेडी ट्रेलर रिलीज
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपट भूलभुलैया २ चाहत्यांच्या मनोरंजनासाठी प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. येत्या २५ मे २०२२ रोजी हा कॉमेडी भयपट सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहेत. तूर्तास या चित्रपटाचा हॉरर ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये मंजुलीकाची झलक दिसतेय. कार्तिक- कियाराची हटके लव्ह केमिस्ट्री दिसतेय. तर तब्बूच्या चेहऱ्यावर कथानकाचे गांभीर्य दिसून येत आहे. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
नुकताच भुलभुलैय्या २ चा अधिकृत ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर साधारण ३ मिनिटांचा आहे. या एव्हढ्या वेळेत मंजुलिकाचा कहर जाणवतोय तर कॉमेडीची हलकी लहरही फील होतेय. सध्या सोशल मीडियाला हा ट्रेलर गाजताना दिसतोय. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. चित्रपटातील मंजुलिका या अतृप्त आत्म्याने शापित हवेली रुह बाबा कसा सोडविणार..? खरतर प्रश्न हा आहे कि सोडविणार कि स्वतःच अडकणार..? कारण मंजुलिकाचा कहर भुलभुलैय्या मध्ये सर्वांनीच पाहिला होता. आतापर्यंत या ट्रेलरला ४.५ मिलियन पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३० हजाराहून अधिक लोकांनी कमेंट्स करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
टी-सीरीजच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट २० मे २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर सर्वत्र हा चित्रपट चर्चेत होता. आता ट्रेलरमुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. याआधी २००७ साली प्रदर्शित झालेला भुलभुलैय्या या हॉरर भयपटाचा हा चित्रपट सिक्वल आहे. यात अक्षय कुमार आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत होते. यानंतर अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया २’ मध्ये कार्तिक आर्यन, किनारा अडवाणीसह तब्बू आणि राजपाल यादव यांच्या मुख्य भूमिका आहेत.