Take a fresh look at your lifestyle.

आली रे आली ‘महाराणी’ आली….; हुमा कुरेशीच्या आगामी सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या ‘महाराणी’ या वेबसिरीजने ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. आता पहिल्या सिजनने इतकं गाजवल्यानंतर दुसऱ्या सिजनची हवा आहे. तशा अपेक्षाही जास्त आहेत. यानंतर अखेर प्रतीक्षा संपली आहे कारण महाराणी सिरीजचा दुसरा सिजन ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘महाराणी’ या वेबसिरीजच्या सीझन २ चा ट्रेलरसुद्धा नुकताच रिलीज झाला आहे. यावेळेळी राणी भारती जबरदस्त कमबॅक करतेय. हा ट्रेलर पाहिल्यावर रिलीजची घाई लागली नाही तर विचारा.

पहिल्या सिजनच्या यशानंतर दुसऱ्या सिजनकडून फार अपेक्षा आहेत. या सिजनमध्ये राजकारणाच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्याचे दिसून येणार आहे. शिवाय या सिरीजमध्ये नवीन कुमार अजूनही बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विरोधक हात धुवून राणी भारतीच्या मागे पडले आहेत. यावेळी राणी आपल्या पतीसोबतही संघर्ष करताना दिसेल. चारही बाजूंनी घेरलेली राणी भारती या प्रसंगातून कशी बाहेर पडेल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

या ट्रेलरच्या सुरुवातीलाच जातीच्या आधारावर होणारा भेदभाव दर्शवला आहे. यासाठी लोक एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. दरम्यान एका मुलाने स्वतःला पेटवून घेतल्याचा अंगावर काटा आणणारा सीनही दाखवण्यात आला आहे. ‘वर्मा आयोगाच्या विरोधात जाण्यासाठी मी काहीही करू शकतो’, असा जबरदस्त डायलॉग हा तरुण बोलतो आणि स्वतःला पेटवून घेतो. दुसरीकडे मिस पाटणा स्पर्धेची विजेती मिस शिल्पा अग्रवाल हिची हत्या होते. यामुळे संपूर्ण बिहारला मोठा धक्का लागतो. याचाच फायदा घेत विरोधकांनी राणी भारतीला घेरायचं ठरवलं आहे. एकंदरच ‘महाराणी सीझन २’ आधीपेक्षाही मजबूत आहे आणि येत्या २४ ऑगस्ट २०२२ रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.