Take a fresh look at your lifestyle.

मी पुन्हा येईन! घडून गेलेल्या सत्तानाट्याचं बंडखोर रहस्य; पहा ट्रेलर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात महाराष्ट्राचे राजकारण पुरते ढवळून निघाले आणि जनतेला विचार करावा लागेल इतकी सूत्र बदलली. यातच घडलेल्या सत्ता नाट्याचा आशय असणारी ‘मी पुन्हा येईन’ या वेब सिरीजची घोषणा झाली. अगदी टिझर प्रदर्शित झाला आणि आता तर ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. येत्या २८ जुलै २०२२ रोजी प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हि वेबसिरीज प्रदर्शित होणाऱ आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे हे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. शिवाय रिलीज झालेल्या ट्रेलरमधील कथानक, संवाद, विनोदी किस्से सारं काही भन्नाट आहे. राजकारणातील काही बाजूंचे व्यंगात्मक ‘मी पुन्हा येईन’मधून आपण पाहणार आहोत. राजकारणातील नाटकाभोवती फिरणारी हि सिरीज बरंच काही बोलून जाईल. त्यामुळे याबाबत प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे.

आपल्या आगामी ‘मी पुन्हा येईन’ या सिरीजबद्दल बोलताना लेखक आणि दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले कि, ‘प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही सर्वोत्तम प्रतिक्रिया असते. आता ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात, हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. बहुमतासाठी पक्षाची चाललेली धडपड, आमदारांची पळवापळवी, कारस्थाने सत्तेसाठी कोणत्या थराला जातात, याचे गंमतीशीर चित्रण ‘मी पुन्हा येईन’मध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणाचे काही खरे नाही, हेच खरे आहे, हे हसत खेळत सांगणारी ही सीरिज आहे. मला खात्री आहे, हे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईलच याशिवाय यातील मनोरंजक ट्विस्ट्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतील.’

याशिवाय प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले कि, ‘आम्ही नेहमीच आमच्या ओटीटीवर उत्तमोत्तम आणि नवीन आशय देण्याच्या प्रयत्न केला आहोत. ‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेब विश्वासाठी एक वेगळी संकल्पना आहे आणि मला या गोष्टींचा विशेष आनंद आहे की, ही मनोरंजनात्मक सीरिज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठीवर पाहता येणार आहे.’