Take a fresh look at your lifestyle.

मराठ्यांकडे आग ओकणाऱ्या नजरा आहेत..; ‘सरसेनापती हंबीरराव’चा तळपता ट्रेलर पहाच

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ आता लवकरच रिलीज होणार आहे. मात्र त्याआधी या चित्रपटाची एक झलक घेऊन त्याचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या फर्स्ट लूकला आणि टीझरला प्रेक्षकांनी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिला होता. यानंतर सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या तळपत्या रक्त सळसळणाऱ्या ऐतिहासिक “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत.

उभ्या महाराष्ट्राला या चित्रपटाची ओढ लागून राहिली असताना त्याचा ट्रेलर प्रदर्शित होणे हि आनंदाचीच बाब आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकता कि, मराठी अभिनेता गश्मीर महाजनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतो आहे. स्वराज्य रक्षणासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या हंबीररावांचा सोनेरी इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. हंबीरराव हे छत्रपतींचे मामा होते आणि मामा म्हणून नाते जपताना स्वराज्यासाठीचे कर्तव्यदेखील त्यांनी पार पाडले आहे.

या ट्रेलरसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! बहुचर्चित महाराष्ट्राचा महासिनेमा सरसेनापती हंबीरराव चा ट्रेलर आज आम्ही छत्रपती संभाजी महाराज जयंती निम्मित प्रदर्शित करत आहोत. जसे प्रेम आजवर तुम्ही या आपल्या सिनेमा वर केले तसेच प्रेम सैदॆव राहूद्या. स्वराज्यचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्याच्या कारकिर्दी मधील स्वराज्यातल्या घडामोडी तुम्हाला या सिनेमाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतील.

या ट्रेलरने चाहत्यांच्या काळजाला हात घातला असेल यात काहीच वाद नाही. एका वीर योद्ध्याचे करावे तरी वर्णन किती..? साहस, शौर्य आणि उत्तम संवादाने भरलेला हा ट्रेलर पाहून कुणालाही भरून येईल यात काहीच वाद नाही. ‘परिस्थती जेवढी बिकट मराठा तेवढा तिखट’, ‘शिवाजी हा कोना एकाचा नाही तर समद्या रयतेचा आहे’, ‘संभाजी समजून घ्यायला काळजी शिवाजीचं असायला हवं’, आणि जेव्हा छत्रपती म्हणतात कि तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळो तेव्हा काळजाचा ठोका असा काही चुकतो कि बस्स.. या ट्रेलरमधून हा चित्रपट कधी रिलीज होणार याची उत्सुकता आणखीच वाढली आहे.