Take a fresh look at your lifestyle.

‘अनपॉज़्ड: नया सफर’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरनंतर ट्रेलर चर्चेत; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘अनपॉज्ड: नया सफर’ हा एक बहुप्रतिक्षित हिंदी एंथोलॉजी चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच अमेझॉन प्राईम व्हिडीओने या चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच केले होते. हे मोशन पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. या एंथोलॉजीमध्ये एकूण पाच चित्रपट असणार आहेत. याच्या पाचही चित्रपटांची स्टार-कास्ट अतिशय उल्लेखनीय आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक चित्रपटाची एक वेगळी कथा, वेगळा पाया आणि वेगळे असे रंजक वळण असलेले कथानक आकर्षित करणारे आहे. तूर्तास सोशल मीडियावर या चित्रपटाच्या मोशन पोस्टरबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. यानंतर आता ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

‘अनपॉज़्ड: नया सफर’ हा एंथोलॉजी चित्रपट अगदी शिर्षकाप्रमाणेच उत्तम दर्जा दर्शवितो आहे. याचे सुंदर पार्श्वसंगीत, मोशन पोस्टर हे एकंदरच चित्रपटाच्या आकर्षणाचे कारण ठरत आहे. यामध्ये तीन तिगडा, द कपल, गोंद के लड्डू, वॉर रूम आणि वैकुंठ शीर्षक असणारे पाच रंजक कथानकाचे जबरदस्त चित्रपट आहेत. हि शीर्षके, त्यांचे पोस्टर यातील चित्रपटांची रंजकता आणि कथानकाची झलक देते. या चित्रपटाचा ट्रेलर १५ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. यामध्ये लॉकडाऊनचा अनुभव प्राइम व्हिडीओने अनपोज्ड या सीरिजच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

जेव्हा आयुष्यात सगळं काही संपलं आहे असं वाटत तेव्हा कुठेतरी एक आशेचा किरण असतो. हा आशेचा किरण तोपर्यंत आपल्याला दिसत नाही जोपर्यंत आपण तो पाहत नाही. अश्याच स्वरूपाच्या कथानकाचा या चित्रपटात समावेश आहे. तूर्तास या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘अनपॉज़्ड- नया सफर’ मध्ये नुपूर अस्थाना, अयप्पा केएम, रुचिर अरुण, शिखा माकन आणि नागराज मंजुळे या चित्रपट निर्मात्यांनी आपली कला दर्शवली आहे. या ५ अनोख्या चित्रपट निर्मात्यांनी एकत्र येऊन आशा, प्रेम, कनेक्शन आणि दुसरी संधी अश्या प्रत्येक पायावर रचलेल्या कथांसह एक वेगळे सादरीकरण निर्माण केले आहे.