Take a fresh look at your lifestyle.

अखेरचा हा तुला दंडवत! भारतरत्न लता मंगेशकर यांना पोलीस पथकाकडून मानवंदना

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देशाचा आवाज, भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी ८.१२ वाजता निधन झाले. दरम्यान त्या ९३ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यानंतर आता लता दीदींचे पार्थिव ब्रीच कॅंडी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथे नेण्यात आले आहे. येथे दुपारी ३ वाजेपर्यंत अंत्य दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाईल. याठिकाणी अनेक दिग्गज कलाकार मंडळी आणि नेते मंडळी उपस्थित आहेत. दरम्यान त्यांना मुंबई पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात येत आहेत. लता दीदींचे निधन हे मंगेशकर कुटुंबियांसोबत संपूर्ण चाहता वर्ग आणि गायन क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी आहे.

लता दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे चाहते आणि अनेक दिग्गज मंडळी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा आहेत. हुंदके देणारे, टाहो फोनारे आवाज संपूर्ण वातावरण शोकमय झाल्याचे दर्शवित आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लता दीदी या भारतरत्न असून देशाचा आवाज आहेत. त्यांना मुंबई पोलीस पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर लता दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. गायन क्षेत्रातील नामांकित गायिका आणि स्वरसम्राज्ञी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे ज्यामध्ये वयाची मर्यादा नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लता दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथे सचिन तेंडुलकर, जावेद अख्तर, अनुपम खेर, सुभाष देसाई, बाळा नांदगावकर, आदित्य ठाकरे, अनिल देसाई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसारखे दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. लता दीदी यांची काळजी घेणारे त्यांचे सहाय्यक अश्या प्रत्येकाच्या भरलेल्या उरातून केवळ लता दीदींच्या नसण्याचे दुःख ओझरतं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लता दीदींचे निधन हि बाब अक्षरशः हृदयद्रावक आहे. लता दीदीं यांचे पार्थिव ४ वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे नेण्यात येईल. यानंतर त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ४.३० वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. लता दीदींचे निधन हे देशाचे आणि संपूर्ण संगीत सृष्टीचे नुकसान आहे आणि लता दीदींचे स्वर अमर आहेत. यामुळे लता दीदी नेहमीच स्मरणात राहतील अश्या शोकसंवेदना अनेक दिग्गजांनी व्यक्त केल्या आहेत.