Take a fresh look at your lifestyle.

‘तुझेच मी गीत गात आहे’; 12 वर्षानंतर उर्मिला कोठारेचे मालिका विश्वात कमबॅक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच नवनवीन मालिका घेऊन प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा बहार आणत असते. त्यामुळे प्रत्येक मालिकेतील कलाकार हा प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबाचा एक भाग वाटू लागतो. यानंतर आता आणखी एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांना नवीन गोष्ट आणि नवे कलाकार भेटणार आहेत. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’. पण या मालिकेत एक असा चेहरा आहे जो ओळखीचाही आहे आणि लोकप्रिय देखील आहे. हा चेहरा म्हणजे उर्मिला कानिटकर कोठारे. ही नवी मालिका येत्या २ मे २०२२ पासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचे कथानक हे ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेचे मराठी व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची हि गोष्ट आहे. त्यामुळे हि कथा प्रेक्षकांना अत्यंत भावणारी ठरेल असा निर्मात्यांचा विश्वास आहे. शिवाय सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानिटकर – कोठारे तब्बल १२ वर्षांनंतर या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आणि मालिका विश्वात कमबॅक करणार आहे. तिच्या पत्राचे नाव वैदेही असे असणार आहे आणि ती स्वराच्या आईची भूमिकेत दिसेल.

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत आपण साकारत असलेल्या वैदेही या भूमिकेविषयी बोलताना उर्मिला म्हणाली कि, “खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहसोबत आणि अर्थातच स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्यासोबत खूप जुनं नातं आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका मी आवर्जून पाहते. नायिका म्हणून या प्रवाहात आता मी देखिल सामील होणार आहे त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे.”