Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता कुशल पंजाबीचे निधन, गळफास घेऊन केली आत्महत्या…

0

चंदेरी दुनिया । टीव्हीमालिकांमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारा कलाकार म्हणजे अभिनेता कुशल पंजाबी. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत कुशल पंजाबीने विविध मालिका आणि सिनेमात दर्जेदार भूमिका साकारल्या. त्याच्या या भूमिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या. मात्र कमी वयातच कुशलने जगाचा निरोप घेतला. कुशल पंजाबीचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याने सुसाइड केल्याची माहिती समोर येत आहे. कुशलचा मित्र करणवीर बोहराने कुशलच्या निधनाची बातमी सांगताच टीव्ही इंडस्ट्रीत सारेच शॉक झाले आहेत.


काल रात्री त्याच्या घरात त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. कुशलने अशाप्रकारे सुसाईड करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आज दुपारी 1 वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कुशल हा 37 वर्षाचा होता. त्याने युरोपियन मुलीसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती.

त्यांना एक मुलगा देखील आहे. 2016 ला त्याच्या मुलाचा जन्म झाला होता. ‘मरजावां’ मालिकेत तो अखेरचा झळकला होता. कुशलची अचानक एक्झिट सा-यांच्या मनाला चटका लावून गेली.

Leave a Reply

%d bloggers like this: