Take a fresh look at your lifestyle.

हिला लॉकडाऊनमध्ये वेडं लागलंय..! ‘दीया और बाती हम’ची ‘संध्या बींदणी’ सोशल मीडियावर झाली ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘दीया और बाती हम’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘संध्या बींदणी’ अर्थात अभिनेत्री दीपिका सिंह सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून ती यामुळेच का काय चांगलीच चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून दीपिका एक ना अनेक कारणांनी सारखीच सोशल मीडियावर ट्रोल होतेय. याआधी मुंबईत तौत्के वादळाच्या तुफान तडाख्यात उन्मळून पडलेल्या झाडांसमोर डान्स व फोटोशूट केल्याने दीपिका सिंग सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. आता दीपिकाचा एक डान्स व्हिडीओ पाहून नेटकर्‍यांची पूर्ती सटकली आहे. परिणामी ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.

अभिनेत्री दीपिका सिंगने ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती अमेरिकन रॅपर कार्डी बीच्या ‘अप’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. दीपिकाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लगेच वायरल झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सने तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करणे सुरू केले. ‘मी तुझ्या अ‍ॅक्टिंगचा फॅन आहे. पण डान्सचा अजिबात नाही,’ असे एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले. तर एकाने ‘भयानक डान्सर’ म्हणून तिची खिल्ली उडवली. हा काय वेडेपणा, हिला लॉकडाऊनमध्ये वेडं लागलंय, अशा कमेंट्स करत अनेकांनी दीपिकाला ट्रोल केले.

‘दिया और बाती हम’ ही मालिका २०११ साली छोट्या पडद्यावर आली होती. या मालिकेने अगदी काहीच वेळात रसिकांच्या मनात आपले स्थान मिळवले होते. या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंग हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज नामक मुख्य भूमिका साकारलया होत्या. प्रेक्षकांना संध्या आणि सुरजची ही जोडी चांगलीच भावली होती. राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही उच्चांक गाठला होता. लग्नानंतर दीपिकाने टीव्हीपासून थोडा ब्रेक घेतला आहे. मात्र सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं मनोरंजन करत असते आणि अनेकदा ट्रोलही होते.