हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आईसाठी तीचं मुलं हि पहिली प्रायॉरीटी असते. त्यामुळे जगातील प्रत्येक आईला तिच्या मुलांहून अधिक प्रिय काय असे विचारले तर ती काहीच नाही असेच म्हणेल. पण आजकालच्या स्त्रिया वर्किंग मॉम आहेत. ज्या घर, कुटुंब, मुलं आणि यांसह आपल्या कामाची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. पण तरीही त्यांच्या मनात कुठेतरी एक खदखद निर्माण करणारा कोपरा असतो.
अशीच एक खंत व्यक्त करताना अभिनेत्री धनश्री कडगांवकरने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धनश्री झी मराठीवर सध्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेत शिल्पी हे नकारात्मक पात्र साकारते आहे.
धनश्रीने तिच्या लहान मुलासाठी अर्थात कबीरसाठी व्याकुळ होत हि पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिलंय कि, ‘कबीर फक्त दीड वर्षांचा होता जेव्हा मी त्याला सोडून काम करायला सुरुवात केली. पुणे सोडून मुंबईत आले. लगेच त्याला इथे आणणं शक्य नव्हतं. त्याचं व्हॅक्सिनेशन, डॉक्टर्स सगळं पुण्यात होतं. असं वाटलं खूप मोठी चूक झाली माझ्या कडून किंवा घाई केली का मी… थोडं थांबायला हवं होतं.. निदान तो बोलू लागेपर्यंत तरी.. तो मला विसरून जाईल का असंही वाटलं होतं. पण ती एक फेज असते. ती पास झाली कि गोष्टी होतात सगळ्या नीट. खरंतर अजून कबीरने सिरीयल बघितली पण नाहीये. मुळात त्याला टीव्हीचं अजून इंट्रोड्युस केला नाहीये आम्ही. त्याला फक्त इतकच माहितीये कि आई शूटिंग करते. मेकअप करते’.
पुढे लिहिलंय, ‘मी नाहीये म्हणून त्याने आजपर्यंत कधीच असा खूप गोंधळ घातला नाही (या गोष्टीचं बरं हि वाटतं पण तितकंच वाईट पण वाटतं. सगळ्या न्यू वर्किंग मॉम्स सहमत असतील याला) अजून तरी कबीर छान सपोर्ट करतोय. पुढचं माहित नाही. या सगळ्यात दुर्वेश आई आणि बाबा असं दोन्ही बनून गेला. त्याला एके दिवशी सांगितलं कि मी शिल्पी नावाचं कॅरेक्टर करते. तेव्हा तो शब्द कदाचित त्याला खूप आवडला आणि त्या नावात, त्या शब्दात त्याला काहीतरी गंम्मत वाटली असावी. म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा तो शिल्पी म्हणतोय तेव्हा तेव्हा तो खूप हसतोय. आत्ता हि सुरुवात आहे. वाट बघीन मी त्याच्या कडून हे ऐकायची कि ”आई तू खूप छान काम करतेस आणि असंच काम करत राहा. तू मला वेळ फार देऊ शकत नाहीस पण तू माझ्या भविष्याची तरतूद करतेयस आणि त्या पेक्षा महत्वाचं म्हणजे तू तुझी पॅशन फॉलो करतेय”. बास.. आणखी काय हवं असेल मला. बास असेच छान छान प्रोजेक्ट्स मला मिळत राहो. तुम्हा सगळयांचं प्रेम असंच राहू द्या’.
Discussion about this post