Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल; पोस्ट शेअर करत म्हणाली, गेले काही दिवस जरा…

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 16, 2023
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shivangi Joshi
0
SHARES
432
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील नायरा म्हणजेच अभिनेत्री ​​शिवांगी जोशी अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे चाहते नेहाचं तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. मात्र आज तिच्याविषयी एक अशी माहिती समोर आली आहे ज्यामुळे तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. शिवांगीने स्वतःच सोशल मीडियावर माहिती शेअर करताना सांगितले आहे कि, तिला किडनीचे इन्फेक्शन झाले आहे आणि त्यामुळे ती रुग्णालयात ऍडमिट आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये हेल्थ अपडेट शेअर केले आहे. सोबत हॉस्पिटलच्या बेडवर झोपून हसतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by शिवांगी जोशी (@shivangijoshi18)

अभिनेत्री शिवांगी जोशीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिचा रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये माहिती देताना लिहिले आहे कि, ‘गेले काही दिवस जरा कठीण गेले आहेत. मला किडनी इन्फेक्शन झाले आहे. पण माझे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी माझ्यासोबत आहेत. माझी रुग्णालयात खूप चांगली काळजी घेतली जात आहे. सध्या मला बरं वाटत आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या शरीराची, आरोग्याची काळजी घ्या. पाण्याची शरीरात कमी होऊ देऊ नका. लवकरच मी पुन्हा जोमाने कामाला लागेन. सध्या तब्येतीत बरीच सुधारणा आहे.’ शिवांगीच्या या पोस्टवर तिचे मित्र मंडळी आणि चाहते तिला तब्येतीची काळजी घेऊन लवकर बरी हो असे सांगताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by शिवांगी जोशी (@shivangijoshi18)

अभिनेत्री शिवांगी जोशींचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे. शिवांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि तिचे इंस्टाग्रामवर जवळपास ७ मिलियनपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत. आतापर्यंत शिवांगीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. यामधील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हि मालिका आणि यातील तिचे नायरा हे पात्र तुफान गाजले. शिवाय ‘बालिका वधू २’ आणि ‘खतरों के खिलाडी सीजन १२’मध्येसुद्धा शिवांगी दिसली होती. आता लवकरच ती आगामी मालिका ‘बेकाबू’मध्ये ईशा सिंग, शालिन भानोत आणि मोनालिसा यांच्यासोबत दिसणार आहे. हि मालिका येत्या १८ मार्च २०२३ पासून कलर्स टीव्हीवर सुरु होते आहे.

Tags: Admitted In HospitalInstagram Posttv actressviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group