Take a fresh look at your lifestyle.

‘मेरे डैड की दुल्हन’ च्या सेटवर लागली आग, अभिनेत्री श्वेता तिवारीचे भाजले हात

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन ।  ‘मेरे डैड की दुल्हन’ या मालिकेच्या सेटवर शुटींगदरम्यान एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अभिनेत्री श्वेता तिवारीचे हात भाजले आहेत. सेटवर आग लागल्यानं ही दुर्घटना घडली आहे. यानंतर प्रॉडक्शन टीममध्ये खूप गोंधळ झाला. आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

अभिनेता फहमान खान आणि श्वेता तिवारी शाहिद आणि करीना यांच्या ‘जब वी मेट’ सिनेमातील एक सीन रिक्रिएट करत होते. या सीनमध्ये श्वेताला आपला स्कार्फ आणि साडी थोडी जाळायची होती. अशातच पडद्यानं आग पकडली. यावेळी श्वेता आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीच्या दुर्घटनेत तिचे हात जळाले अशी माहिती आहे.

फहमान खाननं सांगितलं की, “जेव्हा श्वेता आग विझवत होती तेव्हा सर्वांना वाटलं की, ती आपल्या सीनमध्ये सुधारणा करत होती. जेव्हा तिचे हात जळाले तेव्हा टीमनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात तिची मदत केली. हात भाजलेले असतानाही श्वेतानं शुटींग पूर्ण केली.” अद्याप या सगळ्यावर श्वेता तिवारीची काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.