Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

धक्कादायक!! टीव्ही अभिनेत्रीची मालिकेच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 24, 2022
in Breaking, Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
423
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातून अत्यंत मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवरच तिने गळफास लावून आपले आयुष्य संपवले आहे. तुनिषाने असे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणीतीही माहिती मिळालेली नाही. मात्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तुनिषाचं नायगाव येथे मालिकेचे शूटिंग सुरु होते. या दरम्यान ती सेटवरील मेकअप रुममध्ये गेली आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Maharashtra | TV actress Tunisha Sharma committed suicide by hanging herself on the set of a TV serial. She was taken to a hospital where she was declared brought dead: Waliv Police

— ANI (@ANI) December 24, 2022

मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषाने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये जाऊन गळफास घेतला असल्याचे समोर आले आहे. मेकअप रुममध्ये गेलेली तुनिषा बराच वेळ होऊन गेला आणि तरीही बाहेर आली नाही म्हणून सेटवरील सहकाऱ्यांनी आत प्रवेश केला आणि त्यांना डोळ्यासमोर तुनिषा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी तुनिषाला तातडीने रुग्णालयात हलवलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मृत्यूवेळी तुनिषा फक्त २० वर्षाची होती. मालिकेच्या सेटवर तुनिषाने अशा पद्धतीने आपले आयुष्य संपवणे फारच धक्कादायक आहे. तुनिषा शर्माने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून कळू शकलेले नाही. मात्र तिच्या आत्महत्येमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषाने मृत्यूच्या सहा तास आधी तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. सोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘जे जोशाच्या जोरावर पुढे जातात, ते थांबत नाहीत.’ तिची हि पोस्ट नीट पाहिली तर ती एक प्रबळ इच्छाशक्ती ठेवणारे व्यक्तिमत्व असल्याचे स्पष्ट होते. मात्र तरीही तिने असं काय झालं असेल म्हणून अचानक आत्महत्येचा निर्णय घेतला हे एक कोडंच आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकर याबाबत काही धागे सापडतील अशी आशा आहे.

View this post on Instagram

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषाने ‘भारत के वीर पुत्र- महाराणा प्रताप’ या ऐतिहासिक मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. ती चक्रवर्ती अशोक सम्राट, गब्बर पुंचवाला, शेर-ए-पंजाब: महाराज रणजीत सिंह, इंटरनेट वाला लव आणि इश्क सुभानल्लाह यांसारख्या मालिकांचा भाग होती. याशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही काम केले होते. कहानी २, बार बा देखो आणि फितूर यांसह सलमान खानच्या दबंग ३ मध्येही तिने महत्वाची भूमिका साकारली आहे.

Tags: ANICommits Suicidedeath newsInstagram Posttv actress
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group